Bad Roads In Goa: दोन आठवड्यांत खड्डे न बुजवल्यास रायबंदरवासीयांचा आंदोलनाचा इशारा; कुडचडे येथे कॉंग्रेसतर्फे खड्डे बुजवून आणि शेण सारवून आंदोलन
Curchorem Bad RoadsDainik Gomantak

रस्ते खड्डेमुक्त करा! ‘तारीख पे तारीख’ला लोक कंटाळले; खड्डे बुजवून, शेण सारवून निषेध

Bad Roads In Goa: दोन आठवड्यांत खड्डे न बुजवल्यास रायबंदरवासीयांचा आंदोलनाचा इशारा; कुडचडे येथे कॉंग्रेसतर्फे खड्डे बुजवून आणि शेण सारवून आंदोलन
Published on

Goa Bad Road Condition

कुडचडे/तिसवाडी: राज्यातील रस्त्यांची स्थिती अतिशय बिकट झाली असून सर्वत्र खड्डे पडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. खड्डे बुजवून रस्ते दुरुस्त करण्याची मागणी करूनही सरकारकडून काहीही कृती केली जात नसल्याने पुढील दोन आठवड्यांत खड्डे न बुजवल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा आज रायबंदरवासीयांनी दिला. तर केपे-कुडचडे येथे कॉंग्रेस नेत्यांनी खड्डे बुजवून आणि शेण सारवून आगळ्या पद्धतीने सरकारच्या कारभारावर टीका केली.

पणजी स्मार्ट सिटीच्या कामानिमित्त खोदलेल्या रस्त्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाल्याने आज रायबंदरवासी रस्त्यावर उतरले. रायबंदर येथील रस्ते वाहतूक सोडाच चालण्यायोग्यही नाहीत. त्यामुळे सरकारला पुढील दोन आठवड्यांची मुदत देतो. हे रस्ते दुरुस्त झाले नाहीत, तर रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा रायबंदरवासीयांनी दिला.

रायबंदर पाटो ते बायंगिणी दरम्यान रस्ता खोदल्याने स्थानिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यात स्मार्ट सिटी प्रकल्पाकडून रस्ता दुरुस्तीसाठी केवळ ‘तारीख पे तारीख’ दिली जात असल्याने लोक कंटाळले आहेत. अखेर आज त्यांनी रस्त्यावर येऊन निषेध व्यक्त केला.

कुडचडे येथील आंदोलनात काँग्रेस गट अध्यक्ष पराग सबनीस, ॲड. हर्षद गावस देसाई, श्याम भंडारी, जॉर्ज डिसोझा, महेश नदार, संकेत भंडारी यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कितीजण काळ्या यादीत?

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी चतुर्थीपूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिले होते; पण ते त्यांनी पाळले नाही. तसेच जे कंत्राटदार याला जबाबदार आहेत, त्यांना काळ्या यादीत टाकणार असल्याचे सांगितले; पण गेल्या पाच वर्षांत त्यांनी एका तरी कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकले का? ‘एमव्हीआर’ या कंत्राटदाराने जी कामे केली आहेत, त्या रस्त्यांची स्थिती बिकट झाली असून त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून राज्य सरकारचा जावई असल्यासारखे त्यांनाच कामे दिली जातात, अशी टीका पाटकर यांनी केली.

Bad Roads In Goa: दोन आठवड्यांत खड्डे न बुजवल्यास रायबंदरवासीयांचा आंदोलनाचा इशारा; कुडचडे येथे कॉंग्रेसतर्फे खड्डे बुजवून आणि शेण सारवून आंदोलन
Mhadei Water Dispute: म्हादईप्रश्नी दुटप्पीपणा चालणार नाही! मुख्यमंत्री कडाडले

शेण सारवा, खड्डे बुजवा!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखाली कुडचडेत आज रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये शेण आणि माती भरून आंदोलन केले. भाजप सरकारच्या काळात रस्त्यांची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. वारंवार मागणी करून देखील या विषयाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अखेर आंदोलन करून आम्हाला निषेध करावा लागला, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com