Raibandar Fire News: रायबंदरमध्ये आगीचे थैमान! 2 दुचाकी, 4 कार जाळून खाक; लाखोंचे नुकसान

Raibandar fire incident: रायबंदर फेरी धक्क्याजवळील कारशेड परिसरात रविवारी संध्याकाळी उशिरा भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Raibandar fire incident
Raibandar fire incidentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: रायबंदर फेरी धक्क्याजवळील कारशेड परिसरात रविवारी संध्याकाळी उशिरा भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीत एक सायकल, दोन दुचाकी आणि दोन चारचाकी गाड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र लाखोंचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे.

संध्याकाळी सुमारे ४:४७ वाजता साडेसातच्या सुमारास कारशेडच्या मागील भागातून धुराचे लोट उठताना दिसताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाच्या मुख्यालयात फोन करून याची माहिती दिली.

काही क्षणातच आगीने संपूर्ण कारशेडला वेढले आणि शेजारी उभ्या असलेल्या वाहनांनी देखील पेट घेतला. आगीची तीव्रता पाहता नागरिकांनी गाड्या दूर नेण्याचा प्रयत्न केला, मात्र ज्वाळांचा वेग इतका प्रचंड होता की काही मिनिटांत संपूर्ण शेड पेटून उठली.

Raibandar fire incident
Xeldem Fire: शेल्डे येथील शिवनगरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे घराला आग; मोठी दुर्घटना टळली

कशामुळे लागली आग; तपास सुरू

गोवा अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी यश मिळविले. दलाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आग लागल्याचे कारण अद्याप मिळाले नाही. अग्निशमन विभागाच्या अहवालानुसार, या घटनेत सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, शेडलगत असलेली काही वाहने आणि परिसरातील घरे सुरक्षित ठेवण्यात दलाला यश आले. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अग्निशमन दल आणि पोलीस तपास सुरू आहे.

Raibandar fire incident
Goa Fire: कळंगुट येथे भीषण आग! सिलिंडरचा स्फोट, आगीत खोली जळून खाक; लाखोंचे नुकसान

वार्कात दोन दुचाकींना आग

वार्का येथे घरासमोर पार्क केलेल्या दोन दुचाकींना आग लागून अंदाजे दोन लाखांची हानी झाली. आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. विनंती कोलकर यांच्या मालकीच्या ह्या दुचाकी आहेत. रविवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दुचाकीला आग लागून आवाज ऐकून घरातील मंडळी बाहेर आली असता, त्यांना आग लागल्याचे दिसून आले. मागाहून शेजारीही जमले. आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकानी पाण्याचा माराही केला. मडगाव अग्नीशमन दलाचे अधिकारी गिल सोझा यांच्या मार्गदर्शनाखाली दलाच्या जवानांनी नंतर घटनास्थळी जाऊन आग विझवली. या दुर्घटनेत अ‍ॅक्टीव्हा व टीव्हीएस एनटॉर्क या दुचाकीलाही आग लागली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com