Viral Video: स्टंट आला अंगाशी, गोव्यात रेसिंग इव्हेंटमध्ये बघता बघता बाईकने घेतला पेट, तरुण थोडक्यात बचावला

India Bike Week Goa Viral Video: देशातील एक प्रसिद्ध इव्हेंट म्हणून इंडिया बाईक वीककडे पाहिले जाते. यात बाईक रेस, म्युझीक सादरीकरण, मोटर सायकल स्टंट पाहायला मिळतात.
Viral Video: स्टंट आला अंगाशी, गोव्यात रेसिंग इव्हेंटमध्ये बघता बघता बाईकने घेतला पेट, तरुण थोडक्यात बचावला
India Bike Week Goa 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

India Bike Week Goa 2024

वागातोर: भारतातील एक थरारक बाईक इव्हेंट म्हणून प्रसिद्ध असणारा इंडिया बाईक वीक ०६ आणि ०७ डिसेंबर रोजी गोव्यात पार पडला. यात देशभरातील बाईक रायडर्स सहभागी झाले होते. या इव्हेंटमध्ये तरुणाच्या स्टंट दरम्यान बाईकने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. यावेळी सजग असलेल्या इतर तरुणांमुळे मोठा अनर्थ टळला.

वागातोर येथील इंडिया बाईक वीक इव्हेंटमधील हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एक तरुण बाईकवर बसून बाईकची वाढवताना दिसत आहे. बाईकच्या सायलेन्सरमधून इलेक्ट्रिक स्पार्क बाहेर पडताना दिसत आहे. तरुण निरंतर रेस वाढवत असताना बाईकने अचानक पेट घेतल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

Viral Video: स्टंट आला अंगाशी, गोव्यात रेसिंग इव्हेंटमध्ये बघता बघता बाईकने घेतला पेट, तरुण थोडक्यात बचावला
CAA: भारतीय म्हणून घेण्यासाठी 43 वर्षे पाहावी लागली वाट; गोव्यात दुसऱ्या पाकिस्तानी व्यक्तीला नागरिकत्व बहाल

Bike ने पेट घेताच तरुण खाली उतरला व दूर जाऊन थांबला. दरम्यान, आसपास असणाऱ्या सजग तरुणांनी गाडीचा स्वीच बंद केला कालांतराने आगीचे प्रमाण कमी झाले. व्हिडिओत देण्यात आलेल्या माहितीनुसार, ही बाईक बीएमडब्ल्यु कंपनीची एस१००० आहे. बाईक लाखो रुपये किमतीची असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, गोव्यात Everyone as One या थीमवर आधारीत ६ आणि ७ डिसेंबर २०२४ रोजी इंडिया बाईक वीक इव्हेंट पार पडला. बाईक वीकचा ही अकरावी इडिशन होती. यात भारताच्या विविध कोपऱ्यातून बाईक प्रेमी गोव्यात दाखल झाले होते.

Viral Video: स्टंट आला अंगाशी, गोव्यात रेसिंग इव्हेंटमध्ये बघता बघता बाईकने घेतला पेट, तरुण थोडक्यात बचावला
Siolim Cylinder Blast: शिवोलीत सिलिंडरचा स्फोट, भाडेकरु दाम्पत्य भाजले; उपचारासाठी जीएमसीत दाखल

देशातील एक प्रसिद्ध इव्हेंट म्हणून इंडिया बाईक वीककडे पाहिले जाते. यात बाईक रेस, म्युझीक सादरीकरण, मोटर सायकल स्टंट पाहायला मिळतात. बाईक रेसमध्ये हिल क्लायम्बिंग याचा समावेश असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com