Quepem: 3 दिवसांपासून होता बेपत्ता, कुशावती नदीत आढळला सडलेला मृतदेह; 16 वर्षाच्या तरुणाच्या मृत्यूमुळे खळबळ

Quepem 16 year old found dead: तीन दिवसांपूर्वी बेपता झालेल्या अवेडे केपे येथील रॉयडॉन नोरोन्हा या १६ वर्षीय युवकाचा मृतदेह असोल्डा येथील पुलाजवळ कुशावती नदीत तरंगताना आढळला.
Quepem 16 year old found dead
Quepem 16 year old found deadDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव:  तीन दिवसांपूर्वी बेपता झालेल्या अवेडे केपे येथील रॉयडॉन नोरोन्हा या १६ वर्षीय युवकाचा मृतदेह असोल्डा  येथील  पुलाजवळ कुशावती नदीत तरंगताना आढळला. १७ मार्चपासून रॉयडन हा बेपत्ता होता. यासंबंधी केपे पोलिस ठाण्यात तक्रारही नोंद झाली होती.

पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या १३७ (२) व गोवा बाल कायदा कलम ८ अंतर्गत हे प्रकरण नोंदवून घेतले होते. गुरुवारी सायंकाळी सव्वासातच्या दरम्यान मृतदेह नदीच्या पाण्यात तरंगताना आढळला. मागाहुन  तो वर  काढण्यात आला.

Quepem 16 year old found dead
Goa Crime: म्हापसा हादरलं! अपार्टमेंटजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ; मृत्यूचं कारण अद्याप गुलदस्त्यात

मृतदेह सडलेल्या अवस्थेत  होता. अनैसर्गिक मृत्यू म्हणून मायणा कुडतरी पोलिसानी ही घटना नोंदवून घेतली आहे. मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे. पोलिस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गौरव नाईक पुढील तपास करीत आहेत.

Quepem 16 year old found dead
पार्टी पडली महागात! रात्रभर सेलिब्रेशन, पहाटे अस्वस्थता अन् महाराष्ट्राच्या तरुणाचा मृत्यू; ड्रग्जचा ओव्हरडोस की हार्ट अटॅक? तपास सुरू

सुमित मेगेरी मृत्यू : तिघांवर आरोप निश्चित

मिरमार येथील २०२३ मधील मारहाण प्रकरणात सत्र न्यायालयाने मायरन फर्नांडिस (२३), सालुसिन्हो अफोंसो (३१) आणि गौरेश मंगेशकर (२०) या तिघांविरुद्ध आरोप निश्चित केले आहेत. या प्रकरणात जखमी झालेल्या सुमित मेगेरी या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता, त्यानंतर आता या तिन्ही आरोपींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com