Usgao News: तेरा दिवसांनी उसगाव - वाळपई रस्ता खुला

Goa PWD: स्ता एका बाजूने खचल्यामुळे रस्त्याच्या खाली असलेला चिरेबंदी साकवही नादुरुस्त झाला होता
Goa PWD: स्ता एका बाजूने खचल्यामुळे रस्त्याच्या खाली असलेला चिरेबंदी साकवही नादुरुस्त झाला होता
Road WorkDainik Gomantak
Published on
Updated on

गावकरवाडा - उसगाव येथील खचलेला रस्ता अखेर दुरुस्त करण्यात आला असून या मार्गावरून सध्या एकेरी वाहतुकीला प्रारंभ करण्यात आला आहे. या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूची दुरुस्ती सध्या सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतर हा रस्ता पूर्णपणे खुला करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.

गावकरवाडा - उसगाव येथील हा नादुरुस्त रस्ता अखेर तेरा दिवसांनी खुला करण्यात आला आहे. हा रस्ता एका बाजूने खचल्यामुळे रस्त्याच्या खाली असलेला चिरेबंदी साकवही नादुरुस्त झाला होता. त्यामुळे उसगाव ते वाळपई दरम्यानची या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवून अन्य मार्गाने वळवण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची त्वरित दखल घेत रस्ता दुरुस्तीला प्रारंभ केला होता. मात्र, कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे दुरुस्तीकामात अडथळे निर्माण होत होते. शेवटी साकवाच्या ठिकाणी मोठ्या वाहिनी टाकण्यात आल्या असून सध्या एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com