गोव्यात सरकारी नोकरीची संधी, सार्वजनिक बांधकाम विभागात एवढ्या पदांसाठी २ महिन्यांत भरती

सार्वजनिक बांधकाम खात्यात चारशेहून अधिक पदे रिक्त
Nilesh Cabral
Nilesh CabralDainik Gomantak

Goa Pwd Department posts filling In 2 Month : सार्वजनिक बांधकाम खात्यात कनिष्ठ अभियंता व तांत्रिक साहाय्यकांची मिळून चारशेहून अधिक पदे रिक्त आहेत. ती भरण्यासाठी दोन महिन्यांत प्रक्रिया सुरू केली जाईल, असे त्या खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी विधानसभेत सांगितले.

प्रश्नोत्तर तासाला आमदार व्हेंजी व्हिएगस यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर तीन गतिरोधक गेल्या वर्षभरात घालण्यात आले नसल्याचेही त्यांच्या लक्षात आणून दिले. आमदार वीरेश बोरकर यांनी तिसवाडीतील इतर मतदारसंघांत कामे होतात; पण सांतआंद्रेतच का नाहीत, अशी विचारणा केली.

Nilesh Cabral
Goa Medical College : वैद्यकीय पदव्युत्तर आरक्षणावर उद्या सुनावणी

बोरकर यांचा यासंदर्भातील मूळ प्रश्न होता. ते म्हणाले, कामांना केवळ प्रशासकीय मान्यता मिळते. त्यापुढे फाईल सरकत नाही. प्राधान्याने करावयाच्या कामांना प्राधान्य मिळत नाही. प्रलंबित कामे कधी मंजूर होणार याची माहिती द्यावी. आता मी कामांची फाईल सभागृह पटलावर ठेवतो, ती कामे कधी मंजूर होणार हे सांगावे. आमदार निधीतील कामेही मंजूर होत नाहीत.

व्हिएगस यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यावर किती काळात गतिरोधक घालणार, अशी विचारणा केली. आमदार चंद्रकांत शेट्ये यांनी खाते कधीपासून ई-प्रशासनाकडे वळणार, असे विचारले.

Nilesh Cabral
Banastarim Bridge Accident : मद्यधुंद अवस्‍थेमुळेच अपघात; चालकाला कोठडी

अतिरिक्त पदांचा भार

काब्राल यांनी या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले, की कनिष्ठ अभियंत्यांना साहाय्यक अभियंतापदी बढती दिली तरी त्यांना कनिष्ठ अभियंता पदाचेही काम करावे लागते. हीच बाब कार्यकारी अभियंता आणि पर्यवेक्षक अभियंता पदावर काम करणाऱ्यांची आहे. एकेका अधिकाऱ्याकडे दोन-दोन पदांचे ताबे असल्याने काही प्रमाणात कामे मागे पडली आहेत.

बोरकर यांनी नेमक्या कामाविषयी विचारल्यास त्यांना ते काम कुठवर आले ते सांगता येईल. गतिरोधकांचा विषय ७-८ महिन्यांत मार्गी लावणार. सगळे गतिरोधक एकाच मापाचे असावेत, असे धोरण निश्चित करण्यात येत आहे. सर्व सेवांसाठी एक ॲप आणले जाणार आहे.

- नीलेश काब्राल, सार्वजनिक बांधकाम मंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com