Purumentachem Fest: रानमेवा ते सुकी मासळी! उकडे तांदूळ, आंबे अन् काकवी! पुरुमेंताची परंपरा, पणजीत उद्‌घाटन

Purumentachem Fest Panaji: कांपाल-पणजी येथे डॉ. फ्रान्‍सिस लुईस गोम्‍स गार्डनमध्‍ये ‘गोमन्‍तक-तनिष्‍का’ व्‍यासपीठातर्फे पुरुमेंत फेस्‍ताचे आयोजन करण्‍यात आले आहे.
Purumentachem Fest News
Purumentachem FestDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ‘पुरुमेंत फेस्‍ताला कित्‍येक पिढ्यांची परंपरा आहे. ती जपून, पावसाळ्यातील बेगमीच्‍या निमित्ताने ग्राहकांना ‘लज्‍जतदार’ उपलब्‍धी करून देत, राज्‍यभरातील पारंपरिक व्‍यावसायिक महिलांच्‍या स्‍वावलंबनास ‘गोमन्‍तक-तनिष्‍का’ने मोठे व्‍यासपीठ निर्माण करून दिले आहे. हा उपक्रम कौतुकास्‍पद व आदर्शवत आहे’, अशा शब्‍दांत महापौर रोहित मोन्‍सेरात यांनी वाखाणणी केली.

कांपाल-पणजी येथे डॉ. फ्रान्‍सिस लुईस गोम्‍स गार्डनमध्‍ये ‘गोमन्‍तक-तनिष्‍का’ व्‍यासपीठातर्फे पुरुमेंत फेस्‍ताचे आयोजन करण्‍यात आले आहे. यंदाचे चौथे वर्ष असून, फेस्‍ताचे उद्‌घाटन महापौर रोहित मोन्‍सेरात यांच्‍या हस्‍ते केले.

यावेळी नगरसेवक (स्वीकृत) किशोर शास्त्री, ‘गोमन्तक’चे सहसंपादक नीलेश करंदीकर, ‘गोमन्तक’चे मुख्य प्रतिनिधी अवित बगळे, साहाय्यक व्यवस्थापक-वितरण भारत पोवार, प्रसारण आणि तांत्रिक व्यवस्थापक संजय हंद्राळे, इव्हेंट एक्‍झीक्‍युटीव ऋषिकेश बेहरे, मुख्य व्यवस्थापक प्रोडक्शन अमर ज्योती, साहाय्यक व्यवस्थापक डीटीपी संतोष पाटील, ‘गोमन्तक टीव्ही’चे वृत्तसंपादक विश्‍वनाथ नेने, जाहिरात विभागाच्या स्मिता सावईकर, वितरण विभागाचे प्रमुख संजय पाटील, ‘एचआर’ अलिशा नाईक, कार्मिक विभागाच्‍या हेमा फडते आदी उपस्थित होते.

खवय्यांसाठी ‘रानमेवा’

खवय्यांसाठी रानमेवा आहे, ज्‍यात करवंद, जांभूळ, जांभ व इतर फळे उपलब्ध आहेत. त्यासोबतच गोमंतकीय खाद्यसंस्कृतीतील शिरवाळ्यो, पोळे, कोकम सरबत व इतर विविध प्रकारची पेये उपलब्ध आहेत. अनेक नागरिक खास खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सना भेट देत आहेत.

Purumentachem Fest News
Khoshi Lokanche Fest : गोव्यात प्रथमच ‘खोशी लोकांचे फेस्‍त’ उत्साहात! आनंद, संस्कृती आणि विविधतेचे दर्शन, घुमट गजालीला प्रतिसाद

२५ स्टॉल्सची मांडणी

फेस्तामध्ये पेडणे ते काणकोणपर्यंतच्या गावागावांतील पुरुमेंतासाठी प्रसिद्ध असणारे विविध पारंपरिक जिन्नस उपलब्‍ध आहेत. एकूण २५ स्टॉल्स या फेस्तात मांडण्यात आले असून, तेथे हरमल आणि खोला-काणकोणची मिरची, पेडणे-धारगळ भागातले आळसांदे, चवळी, वेरे-बेती परिसरातील सुकी मासळी, डिचोली, मये, सत्तरी भागातील कोकम, काजूगर (बियो) याशिवाय उकडे तांदूळ, काणकोण-खोतीगावातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने तयार केलेला गूळ, काकवी, घरगुती मसाले, मानकुराद, हापूस, केसरी आंबे अशा अनेक वस्तू या उपलब्ध आहेत.

Purumentachem Fest News
Goa Cashew Fest: काजू हा आमचा वारसा! महोत्सवातून देणार इतिहासाला उजाळा; दिव्या राणेंचे प्रतिपादन

लोकांसाठी सुवर्णसंधी

रविवार, २७ एप्रिलपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत पणजीच्या कांपाल येथील डॉ. फ्रान्सिस्को लुईस गोम्स गार्डनमध्ये ‘तनिष्का पुरुमेंत फेस्त’ सुरू झाले आहे. राज्यातील नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी, अशा स्वरूपाचे हे फेस्त असून पुरुमेंताचे सर्वच साहित्य एकाच ठिकाणी मिळविण्याची ही सुवर्णसंधी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com