Purple Fest: आमच्यानंतर मुलांच्या संगोपनाचे काय? पर्पल फेस्टमध्ये पालकांनी मांडल्या संघर्षकथा

पालकांच्या संघर्षकथा : प्रत्येक तालुक्यात एक पुनर्वसन केंद्र असणे गरजेचे
Purple Fest In Goa
Purple Fest In Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

Purple Fest Goa: माझी मुलगी दिव्यांग आहे. ती व्हिलचेअरवर असते. मी या कार्यक्रमासाठी आल्याने तिच्या संगोपनासाठी माझ्या पतीने 5 दिवसांची रजा घेतली आहे. माझ्यानंतर माझ्या पाल्याचे काय होणार? असा प्रश्‍न प्रत्येक पालकाला पडतो.

त्यावेळी पालक पहिल्यांदा शिक्षण आणि त्याला रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करत, हा प्रश्‍न एकप्रकारे टाळत असतात. मात्र, कधीतरी या प्रश्‍नाला सामोरे जावे लागतेच, असे प्रतिपादन शोभा सचदेव यांनी केले.

पर्पल महोत्सवात ‘आमच्यानंतर आमच्या मुलांचे काय?’ याविषयावर आयोजित चर्चासत्रात त्या बोलत होत्या. हे चर्चासत्र गोवा मनोरंजन संस्थेत दुपारी 2.30 वाजता आयोजिण्यात आले होते. यावेळी पूनम नटराजन, संध्या काळोखे, जमिला हाजिक, शंकरबाबा पापळकर यांनी सहभाग घेतला.

माझ्या मुलीमुळे मी पुनर्वसन केंद्र सुरू केले, ज्यात एकूण 16 दिव्यांग मुले राहात असल्याचे शोभा सचदेव यांनी सांगितले. दिशा चॅरिटेबल ट्रस्टच्या संध्या काळोखे म्हणाल्या, गोवा राज्य तसे लहान आहे, त्यामुळे प्रत्येक तालुक्यात एक पुनर्वसन केंद्र असणे गरजेचे आहे.

शंकरबाबा पापळकरांनी बेवारस मुलांच्या आजीवन पुनर्वसनासाठी कायदा व्हायला हवा आणि दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी ‘वझ्झर मॉडेल’ अवलंबिणे गरजेचे असल्याचे सांगितले.

अंध मातेची गोष्ट : जमिला हाजिक ज्या स्वतः दृष्टीने अंध आहेत त्या म्हणाल्या, बाळंतपणात जरा घाबरले होते. कारण मुलाला कसे सांभाळावे, त्याला कसे भरवावे अशा अनेक समस्या होत्या. मात्र, माझ्या कुटुंबीयांनी, पतीने मदत केली.

मुलाने लहानपणी तीव्र प्रकाश पाहिल्याने त्याची दृष्टी कमी झाली. मुलाने स्वावलंबी जगावे, अशी आमची इच्छा असून तशा प्रकारचे शिक्षण आम्ही त्याला देत आहोत.

Purple Fest In Goa
Goa Environment: 'म्हादई प्रश्नावर गोवा सरकारने वन्यजीव संरक्षण कायद्याचा आधार घेणे घातक' कारण...

त्याच्यामुळे जीवन उमगले

ज्याप्रमाणे दिव्यांग मुलांना आपली गरज असते, त्याप्रमाणेच आम्हीदेखील त्यांच्याशिवाय राहू शकत नाही. माझा मुलगा आता या जगात नाही. मात्र, त्याच्याकडून आम्ही अनेक गोष्टी शिकलो. मी त्याला माझा गुरू मानते.

त्याने आम्हाला जीवनाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी दिली. दिव्यांगांसाठी आपल्या देशात अनेक बदल घडणे जरूरीचे आहे. पालकांनीदेखील एकत्र येऊन त्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे पूनम नटराजन यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com