
पुरी: ओडिशातील प्रसिद्ध पुरी येथे जगन्नाथ रथयात्रेला शुक्रवारपासून (27 जून) भव्य उत्साहात सुरुवात झाली. रथयात्रेत सामील होण्यासाठी देश-विदेशातील लाखो भाविक पुरी येथे पोहोचले आहेत. दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या धार्मिक उत्सवात सहभागी होत भगवान जगन्नाथाच्या रथाचे पूजन करुन स्वतः रथ ओढला. पुरी शहर हे सप्तपुरींपैकी एक असून त्याला पृथ्वीचे वैकुंठ देखील म्हटले जाते. जगप्रसिद्ध जगन्नाथ मंदिर आणि तांत्रिक शक्तीपीठांचे मुख्य केंद्र, विमला शक्तीपीठ, येथे आहे.
रथयात्रेनिमित्त रथ ओढण्याची परंपरा खूप जुनी आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawan t) यांनी या धार्मिक उत्सवात सहभागी होत भगवान जगन्नाथाच्या रथाचे पूजन करुन स्वतः रथ ओढला. त्यांची उपस्थिती ही स्थानिकांसाठी आणि भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरली.
मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी सांगितले की, “देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात भक्ती, श्रद्धा आणि परंपरा यांचे जतन केले जात आहे. ही रथयात्रा त्याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. येथे येऊन मला अपार आध्यात्मिक शांती लाभली.” पुरीपासून सुरु झालेल्या रथयात्रेचा नाद आता संपूर्ण देशभर उमटतो आहे. या यात्रेद्वारे भक्तगण एकत्र येतात आणि प्रभूच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण करतात. यंदा ही यात्रा अनेक नामवंत व्यक्तींच्या उपस्थितीने अधिक भव्य ठरली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.