Crime News: रंगकामाचा बहाणा करून 4 लाखांच्या सोन्याच्या कड्या चोरल्या, पुण्‍यातील चोरट्याला म्‍हापशात अटक

Gold bangle theft: पुण्‍यात एका घराचे रंगकाम करताना बेडरूममधून ४ लाख रुपयांची दोन सोन्याची कडी चोरून फरार झालेल्या संशयिताला गोव्‍यात म्हापसा येथे अटक करण्यात आली.
Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पुण्‍यात एका घराचे रंगकाम करताना बेडरूममधून ४ लाख रुपयांची दोन सोन्याची कडी चोरून फरार झालेल्या संशयिताला गोव्‍यात म्हापसा येथे अटक करण्यात आली. उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्‍यात आली. संशयिताकडून चोरीचे दागिनेही हस्तगत करण्‍यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्‍या २८ जुलै रोजी पुणे शहर पोलिस ठाण्यात प्रमोद शिंदे (कोथरूड-पुणे) याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. शिंदेने तक्रारदाराच्या घराचे रंगकाम करताना बेडरूममधून दोन सोन्याची कडी चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्‍यात आले होते. घटनेनंतर तो फरार झाला होता.

Crime News
Goa khazan Land Regularisation: आता खाजन जमिनीतील बांधकामे होणार नियमित, 2011 अधिसूचनेपूर्वीची बांधकामे कायदेशीर

याबाबत पुण्यातून गोव्यात पोलिसांना अलर्ट करण्‍यात आल्‍यानंतर संशयित प्रमोद हा म्हापसा पोलिस ठाण्याच्या हद्दीत लपल्याचे स्‍पष्‍ट झाले. त्‍यानुसार पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी म्हापसा पोलिसांना तातडीने कारवाईचे आदेश दिले.

पोलिसांनी जलद कारवाई करत संशयित प्रमोद शिंदे याला अटक केली आणि त्याच्याकडून चोरीचे सोन्याचे दागिने देखील हस्तगत केले. त्यानंतर पुणे शहर पोलिसांना बोलावून संशयिताला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.

Crime News
Goa healthcare policy: महागडे उपचार आता सर्वांसाठी परवडणार; दुर्मिळ आजारांवरील औषधांसाठी राज्यात 'अभिनव किंमत' धोरण राबवण्याची सरकारची घोषणा

ही कारवाई उत्तर गोवा जिल्हा पोलिसांच्या दक्ष पथकाने यशस्‍वी पार पाडली. म्हापसा पोलिस निरीक्षक निखिल पालेकर, उपनिरीक्षक विशाल मांद्रेकर, कॉन्स्टेबल राजेश कांदोळकर आणि महेंद्र मांद्रेकर यांचा या पथकात समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com