P.S Sreedharan Pillai Book: येत्या मे महिन्यात होणार राज्यपालांच्या 200 व्या पुस्तकाचे प्रकाशन

गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई मे अखेरीस मल्याळम आणि इंग्रजीमध्ये 12 पुस्तके प्रकाशित करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
P.S Sreedharan Pillai Book
P.S Sreedharan Pillai BookDainik Gomantak
Published on
Updated on

P.S Sreedharan Pillai Book: गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई मे अखेरीस मल्याळम आणि इंग्रजीमध्ये 12 पुस्तके प्रकाशित करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत 28 एप्रिल रोजी मलबार पॅलेसमध्ये राज्यपालांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन करणार आहेत. तर 2 मे रोजी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन त्रिवेंद्रममध्ये एका पुस्तकाचे प्रकाशन करतील.

P.S Sreedharan Pillai Book
Advanced Traffic Cabin: गोव्यातील पहिले अत्याधुनिक, सौरउर्जेवरील वाहतूक नियंत्रण केबिन; या आहेत सुविधा

श्रीधरन पिल्लई हे उत्कृष्ट राजकारणी असल्यासोबतच उत्तम लेखकही आहेत. मे महिन्यात होणारे पुस्तक प्रकाशन हे श्रीधरन पिल्लई यांच्या जीवनातील 200व पुस्तक असणार आहे.

राज्यपालांच्या काही पुस्तकांचे प्रकाशन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपाध्यक्ष जगदीप धनकर, विविध राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री तसेच साहित्यिक यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रकाशनानंतर विविध केंद्रांवर पुस्तकांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. अप्रतिम लेखनाची 50 वर्षे पूर्ण झाल्याचा सोहळा करण्यात येणार असल्याची माहिती राजभवनातर्फे देण्यात आली आहे. काही पुस्तके वारसा वृक्ष, गोव्याची बेटे, गोव्याचे राज्यपाल म्हणून त्यांचा कार्यकाळ आणि इतर अनेक पैलूंवर आधारित आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com