Advanced Traffic Cabin: गोव्यातील पहिले अत्याधुनिक, सौरउर्जेवरील वाहतूक नियंत्रण केबिन; या आहेत सुविधा

गोव्यातील पहिली अभिनव व अत्याधुनिक अशा वाहतूक नियंत्रण केबिनच्या चाव्या एका सोहळ्यात वास्को वाहतूक पोलिस निरीक्षक शैलेश नार्वेकर यांच्याकडे उद्योजक नितीन कुंकळ्येकर यांच्या हस्ते सोपविण्यात आले.
Goa Modern Traffic Cabin
Goa Modern Traffic CabinDainik Gomantak
Published on
Updated on

Advanced Traffic Cabin: गोव्यातील पहिली अभिनव व अत्याधुनिक अशा वाहतूक नियंत्रण केबिनच्या चाव्या एका सोहळ्यात वास्को वाहतूक पोलिस निरीक्षक शैलेश नार्वेकर यांच्याकडे उद्योजक नितीन कुंकळ्येकर यांच्या हस्ते सोपविण्यात आले.

औद्योगिक संघटना वेर्णा औद्योगिक वसाहतीचे रुप बदलण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. येणाऱ्या काळात वसाहतीमध्ये ट्रक टर्मिनल उभारण्याचा विचार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रदीप ए. पी. डी कॉस्ता यांनी सांगितले.

Goa Modern Traffic Cabin
Mormugao Municipal Council: मुरगाव पालिका इमारतीच्या बाजूने अतिक्रमण करत केले गटाराचे काम; वाहनचालक त्रस्त

सदर केबिन वेर्णा औद्योगिक वसाहतीतील राजेश रोडलाईन्सने पुरस्कृत केली आहे. बिर्ला क्रॉस वाहतूक सिग्नलसमोर उभारण्यात आलेल्या केबिनच्या शुभारंभप्रसंगी नितीन कुंकळ्येकर, संघटनेचे अध्यक्ष प्रदीप डिकॉस्ता, वाहतूक पोलिस अधीक्षक बास्सुअट डिसिल्वा, उपअधीक्षक सलिम शेख, वाहतूक पोलिस उपअधीक्षक प्रबोध शिरवईकर, वाहतूक पोलिस निरीक्षक शैलेश नार्वेकर, संघटनेचे माजी अध्यक्ष दामोदर कोचकर, राजेश रोडलाईन्सचे जिगर सोमय्या व इतर मान्यवर उपस्थित होते.

या केबिनाचे वैशिष्ट म्हणजे ती सौरउर्जेवर चालते. त्यामध्ये लहान ऑफिस जागा आहे. दोन बंकर बेड आहेत. बायो जायजेस्टर शौचालये असून केबिन वातानुकूलीत आहे. त्यामुळे तेथे वाहतूक नियंत्रण करणाऱ्या वाहतूक पोलिसांची मोठी सोय झाली आहे.

येणाऱ्या काळात या केबिनसमोर किचन गार्डनही तयार करण्यात येणार असल्याचे डिकॉस्ता यांनी सांगितले. ट्रक टर्मिनल उभारण्यासंबंधी कोमुनिदादकडे जमिनीसंबंधी चर्चा करणार आहोत. तेथे ट्रक टर्मिनल उभारताना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नार्वेकर यांनी सांगितले की, नवीन झुआरी पुलामुळे बिर्ला क्रॉस चौकातील वाहतुकीमध्ये मोठी वाढ झाला आहे. तेथे वाहतूक नियंत्रण केल्यावर एकाद्या दुसऱ्या वाहतूक पोलिसाला विश्रांती करण्याची सोय तेथे नव्हती. परंतू या केबिनमुळे ती समस्या दूर झाली आहे.

तेथे उभारण्यात येणाऱ्या ट्रक टर्मिनलसंबंधी बास्सुअट यांनी समाधान व्यक्त केले. यामुळे ट्रक चालकांना आपले ट्रक एकाचठिकाणी उभे करून विश्रांती करता येईल. ट्रक रस्त्याकडेला उभे करण्याच्या प्रकाराला आळा बसेल असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com