Goa Raj Bhavan: गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते आज, सोमवारी 5 पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. राजभवनातर्फे नई पहल या पुस्तक प्रायोजक योजनेंतर्गत ही पुस्तके प्रकाशित करण्यात आली.
राजभवनात हा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला गोव्यातील लेखक ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो, राज्यपालांचे सचिव एम. आर. एम. राव, राज्यपालांचे ओएसडी मिहीर वर्धन आदी उपस्थित होते.
प्रकाशित झालेली ही पुस्तके कोकणी, मराठी आणि इंग्रजी भाषेतील आहेत. संजय रमेश सालेलकर (कोंकणी), पल्लवी पोळेकर (मराठी), अॅड. मनोहर आडपाईकर (मराठी) या लेखकांनी ही पुस्तके लिहिली आहेत. तर पाचू मेनन यांची इंग्रजीतील दोन पुस्तके आहेत.
या पुस्तकांच्या प्रकाशनाचा खर्च राजभवनने प्रायोजित केला आहे. दरम्यान, या योजनेत पुस्तकांचे विषय काल्पनिक, नॉन फिक्शन, कविता, आत्मचरित्र किंवा कथांचे संकलन असे असायला हवेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.