Goa Election Commission: निवडणूक पारदर्शकतेसाठी अधिकाऱ्यांनी सुचवले 'हे' मार्ग

वास्कोच्या सर्व मतदान केंद्रावर क्षेत्र अधिकारी असणार उपलब्ध
Election Commission
Election CommissionDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: बायणा येथे आज मुरगाव निवडणूक कार्यालयातर्फे कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचा उद्देश निवडणुक प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी नागरीकांमध्ये जागृती निर्माण करणे असा होता. यावेळी मुरगावच्या सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

(Public awareness program was conducted by Mormugao election office)

Election Commission
Goa Agriculture: शेतकऱ्यांना स्वयंभू बनविण्यासाठी युवकांनी पुढे यावे- रमेश तवडकर

राज्य निवडणूक आयोगाच्या संयुक्त विद्यमाने सरकारी हायस्कूल मांगुर हिल, सरकारी हायस्कूल बायणा येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा उद्देश निवडणुक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आधार क्रमांक निवडणूक ओळखपत्राला जोडणे, छायाचित्र निवडणूक यादी दोषमुक्त करणे, 18 वर्षे पूर्ण केलेल्या तरुण तरुणांनी यांना मतदार म्हणून नोंद करणे आवश्यक असल्याचं म्हटले आहे.

Election Commission
Ironman 70.3 Goa: मुंबईचा निहाल बेग ठरला 'आयर्नमॅन'; गतविजेत्या बिस्वरजित सायखोमला टाकले मागे

आज वास्को मतदारसंघाच्या 46 मतदान केंद्रावर क्षेत्र अधिकारी 30 नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. मृत व्यक्ती, इतर ठिकाणी गेलेले मतदार आदींची नावे कमी करण्यासाठी लोकांनी दस्तावेज सादर करून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी आधार कार्ड जोडणी करणे आणि मतदार यादीत नाव नोंदणी करण्याचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com