आंदोलक शिक्षकाच्या प्रकृतीत बिघाड! गोवा सरकारला इशारा

शारीरिक शिक्षकांनी आंदोलन तीव्र केले असून, गुरुवारपासून अहोरात्र धरणे सुरू झाले आहे.
Protesting teachers Warning to Goa government
Protesting teachers Warning to Goa government Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आझाद मैदानावर बुधवारपासून आंदोलन करणाऱ्या अर्धवेळ शारीरिक शिक्षकांचे आंदोलन सुरूच आहे. गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्‍यातील समीर गावकर यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे तात्काळ रुग्णवाहिका बोलविण्यात आली. तेथेच त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आंदोलनादरम्यान कुणाला काही झाल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी सरकारवर असेल, असा इशारा या शिक्षकांनी दिला आहे.

Protesting teachers Warning to Goa government
वास्‍कोत नरकासुराची प्रतिमा बनवण्याची लगबग

शारीरिक शिक्षकांनी आंदोलन तीव्र केले असून, गुरुवारपासून अहोरात्र धरणे सुरू झाले आहे. त्यांना राज्यातील विविध पक्षांकडून पाठिंबा मिळत आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा गंगाराम लांबोर यांनी दिला. राज्यातील विविध माध्यमिक शाळांत 54 अर्धवेळ शारीरिक शिक्षक कार्यरत आहेत. त्यांना केवळ 16 हजार 125 रुपये वेतन दिले जाते. वाढत्या महागाईमुळे त्यांच्यावर संकट कोसळले आहे. सरकारने नोकरीत कायम करावे, या मागणीसाठी त्यांनी बुधवारपासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन आरंभले आहे. त्यांच्या या आंदोलनाला अनेक पक्षांकडून पाठिंबा मिळत आहे. सकाळी गोवा फॉरवर्डचे किरण कांदोळकर यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका करीत या शिक्षकांना न्याय देण्याची मागणी केली.

Protesting teachers Warning to Goa government
गोवा अग्निशमन दलात आमूलाग्र बदल

सायंकाळी तृणमूल काँग्रेसच्या प्रिया राठोड आणि प्रतिभा बोरकर यांनी त्यांची भेट घेतली. त्यांच्या आंदोलनाला तृणमूलचा पाठिंबा असल्‍याची ग्वाही दिली. यावेळी प्रतिभा बोरकर म्हणाल्या, सरकार नोकऱ्यांचे आमिष दाखवून केवळ मते मिळविण्यात मश्‍गूल आहे. जे लोक प्रत्यक्ष राज्यासाठी योगदान देत आहेत, त्यांना मात्र कस्पटासमान वागणूक दिली जात आहे. ही व्‍यवस्था बदलली पाहिजे. आम्ही सदैव या शिक्षकांच्या पाठीशी आहोत.

राज्य सरकार आमच्या आंदोलनाची दखल घेईल, अशी अपेक्षा होती, पण सरकार राजकारणात व्‍यग्र आहे. त्यामुळे आम्ही अहोरात्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही.

- गंगाराम लांबोर, शिक्षक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com