Protest In Delhi : गोव्यातील पर्यावरणप्रेमी दिल्लीच्या जंतरमंतरवर; ओल्ड गोव्यातील 'त्या' बंंगल्यावर कारवाईची मागणी

केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गोव्यातील पर्यावरणप्रेमींचे दिल्लीत आंदोलन
Goa environmentalists Protest in Delhi
Goa environmentalists Protest in DelhiDainik Gomantak

जुने गोवा येथील बेकायदेशीर बंगला पाडण्याप्रश्नी राज्य सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी तसेच केंद्र सरकारचे लक्ष त्याकडे वेधण्यासाठी आज गोव्यातील पर्यावरणप्रेमींनी दिल्ली येथे आंदोलन छेडले.

आज सकाळी जंतरमंतर येथे या आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रतिमा कुतिन्हो, पर्यावरणप्रेमी शंकर पोळजी, सय्यद इम्तियाज, अॅथनी डिसिल्वा, ग्लेन काब्राल आदी उपस्थित होते. जुने गोवे येथील वारसास्थळात असलेला हा बेकायदेशीर बंगला त्वरित पाडावा अशी मागणी यावेळी पर्यावरणप्रेमींनी केंद्र सरकारला केली.

Goa environmentalists Protest in Delhi
Goa Liquor Seized: दवाच्या नावाखाली दारूची वाहतूक, पुण्यात गोवा बनावटीची 66 लाख रूपयांचे मद्य जप्त

जुने गोवे येथील सेंट कॅजिटन चॅपेलजवळील संरक्षित जागेत हा बेकायदेशीर बंगला उभारण्यात आलेला आहे. संरक्षित स्थळी उभारण्यात आलेल्या या बेकायदेशीर बंगल्याच्या प्रश्‍नावरून गोव्यात मोठे आंदोलनही छेडण्यात आले.

राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष कॉंग्रेससह आप, तृणमूल कॉंग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि रिव्होल्युशनरी गोवन्स या राजकीय पक्षांनी या आंदोलनात भाग घेतला होता. स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनीही आवाज उठवला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com