Goa Third District: 'तिसऱ्या जिल्ह्यात काणकोण नकोच! निर्णय लादल्यास रस्त्यावर उतरणार'; स्थानिक आक्रमक

Canacona Third District Protest: तिसऱ्या जिल्ह्यात काणकोणचा समावेश करू नये, तसा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरून याला विरोध करतील, असा इशारा जागृत काणकोणकर संघटनेच्या बॅनरखाली झालेल्या बैठकीत देण्यात आला.
Canacona Third District Protest
Goa Third DistrictDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: प्रस्तावित तिसऱ्या जिल्ह्यात काणकोणचा समावेश करू नये, बळजबरीने तसा प्रयत्न झाल्यास काणकोणवासीय रस्त्यावर उतरून याला विरोध करतील, असा इशारा श्रीस्थळ पंचायत सभागृहात जागृत काणकोणकर संघटनेच्या बॅनरखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत देण्यात आला.

या बैठकीत सर्व पक्षिय नेते व समाज कार्यकर्ते सहभागी झाले होते. तिसऱ्या जिल्ह्यात काणकोणचा समावेश करण्यापूर्वी महसुल खात्याच्या अधिकाऱ्यांनी येथे येऊन तिसऱ्या जिल्ह्यात काणकोणचा समावेश करून कोणता फायदा होणार हे नागरिकांना पटवून द्यायला हवे. तालुक्याचा समावेश तिसऱ्या जिल्ह्यात व मुख्यालय कुडचडे किंवा अन्य ठिकाणी झाल्यास याचा प्रचंड त्रास काणकोणवासियांना होईल, असे यावेळी अनंत अग्नी यांनी सांगितले.

तिसरा जिल्हा करून सरकारी नोकरांची खोगीर भरती करण्याचा सरकारचा डाव आहे. यामुळे कराच्या ओझ्याने दबलेल्या जनतेवर आणखी कराचा बोजा पडणार आहे. तिसरा जिल्हा करायचाच असल्यास किनारी तालुके एकत्र करून तिसरा जिल्हा करा, अशी सूचना मोहनदास लोलयेकर यांनी केली.

Canacona Third District Protest
Goa Third District: तिसऱ्या जिल्ह्याचा मार्ग मोकळा; गोवा मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

मडगाव मुख्यालय हे काणकोणवासियांसाठी सोयीचे आहे. तिसऱ्या जिल्ह्याचे खूळ कोठून आले ते कळण्यास मार्ग नाही, मात्र ते अनावश्यक आहे. काणकोणवासियांवर हा निर्णय लादल्यास या विरोधात रस्त्यावर उतरण्यास भाग पडले, असा इशारा शांताजी नाईक गावकर यांनी दिला.

आंदोलनाशिवाय कोणतीच न्याय मागणी काणकोणवासियांच्या पदरी पडली नाही हा इतिहास आहे. त्याची पुनरावर्ती करण्यास काणकोणवासीय सज्ज असल्याचे सम्राट भगत यांनी सांगितले. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींचे मत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी एक समिती स्थापून आमदार रमेश तवडकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याची सूचना विकास भगत यांनी केली.

Canacona Third District Protest
Goa Third District: 'तिसरा जिल्हा' झाल्याने लोकांची सोय होईल, कामे जलद होतील, ही न पटणारी गोष्ट..

तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय कुडचडे केल्यास वाहतुकीच्या दृष्टीने ते गैरसोयीचे होणार आहे. काणकोणहून कुडचड्याला जायला फक्त तीन बसेस आहेत, ही बाब सर्वच वक्त्यांनी अधोरेखित केली.

या बैठकीला पंच रामू नाईक, पैंगीणचे उपसरपंच सुनील पैंगणकर, पंच प्रवीर भंडारी, सतीश पैंगीणकर आदी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com