रेल्वे मार्ग विस्तार विरोधकांवर 15 जुलै पासून खटला सुरू

गोव्यात रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण झाल्यास त्या मार्गे कोळशाची वाहतूक होऊन गोव्यात प्रदूषण वाढणार असा दावा करून या विस्ताराला विरोध करणाऱ्या चार आंदोलकांविरोधात माडगावच्या प्रथम वर्ग न्यायालयात आता 15 जुलै पासून खटला सुरू होणार आहे.
Prosecution of railway line extension opponents will start from July 15
Prosecution of railway line extension opponents will start from July 15Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : गोव्यात रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण झाल्यास त्या मार्गे कोळशाची वाहतूक होऊन गोव्यात प्रदूषण वाढणार असा दावा करून या विस्ताराला विरोध करणाऱ्या चार आंदोलकांविरोधात माडगावच्या प्रथम वर्ग न्यायालयात आता 15 जुलै पासून खटला सुरू होणार आहे.

Prosecution of railway line extension opponents will start from July 15
कुंडईत ‘एनडीझेड’ क्षेत्रात बांधकामे

अभिजित प्रभुदेसाई, डायना सुवारीस, विकास भगत व फ्रेडी त्रावासो यांच्यावर रेल्वे पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले असून आज मडगावच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अंकिता नागवेकर यांनी आज या आंदोलकांना त्यांच्यावरील आरोप समजावून सांगितले.

सर्व आंदोलकांनी आपल्यावरील आरोप नाकारल्याने न्यायालयाने आता साक्षीपुरावे नोंदवून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. आंदोलकांची बाजू मांडण्यासाठी ऍड. ओम स्टेनली रोड्रीग्स हे न्यायालयात हजर होते.

दक्षिण - पश्चिम रेल्वेने हाती घेतलेल्या मार्ग विस्ताराला विरोध करण्यासाठी 1 नोव्हेंबर 2020 रोजी चांदर येथे मोठे आंदोलन झाले होते. त्यावेळी हजारो आंदोलकांनी एकत्र येऊन रेल्वे मार्ग अडविला होता. या प्रकरणी नंतर रेल्वे पोलिसांनी वरील चार आंदोलकांवर आरोपपत्र दाखल केले होते.

आता 15 जुलै रोजी या प्रकरणी साक्षीपुरावे नोंदविणे सुरू होणार असून या प्रकरणातील तपास अधिकारी रोहित दीक्षित यांना साक्ष देण्यास न्यायालयात हजर राहावे यासाठी समन्स जारी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com