Zuari Bridge: झुआरी पुलावर उभारणार ‘ट्विन टॉवर्स’! 297 कोटी रुपयांचा प्रकल्प; मान्सूननंतर कामाला होणार सुरुवात

Zuari Twin Towers: संपूर्ण प्रकल्पाचे बांधकाम दिलीप बिल्डकॉन कंपनी करणार असून, पूर्णत्वानंतर पुढील ५० वर्षे कंपनीच या टॉवर्सचे संचालन करणार आहे.
Zuari Twin Towers
Zuari Twin TowersDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: नव्याने बांधण्यात आलेल्या झुआरी पुलावर प्रस्तावित असलेल्या ‘ट्विन टॉवर्स’च्या बांधकामासाठी पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन (ईआयए) अभ्यास व किनारपट्टी नियमन क्षेत्र (सीआरझेड) परवानगी मिळवण्याची प्रक्रिया सुरू असून, सर्व आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर मान्सूननंतर प्रत्यक्ष बांधकाम सुरू होईल, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एकूण २९७ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. या टॉवर्सना आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन आकर्षण बनवण्याचा मानस असून, आयफेल टॉवरच्या धर्तीवर पर्यटकांसाठी निरीक्षण गॅलरी व व्ह्यूइंग डेक्स यामध्ये उभारण्यात येणार आहेत. संपूर्ण प्रकल्पाचे बांधकाम दिलीप बिल्डकॉन कंपनी करणार असून, पूर्णत्वानंतर पुढील ५० वर्षे कंपनीच या टॉवर्सचे संचालन करणार आहे. पर्यटकांकडून प्रवेश शुल्क घेऊन खर्चाची वसुली केली जाणार आहे.

टॉवर्सवर कॅफे, रेस्टॉरंट्स व इतर व्यावसायिक उपक्रम सुरू करता येतील का, यावर सध्या विचार सुरू आहे. याबाबत अंतिम निर्णय अद्याप घेतलेला नाही. या टॉवर्सची रचना झुवारी पुलाच्या मूळ संकल्पनेतच समाविष्ट करण्यात आली होती. उत्तर व दक्षिण गोव्याच्या टोकांवर असलेल्या दोन पायलन्सवर हे टॉवर्स उभारण्यात येणार आहेत, व यांचा भार सहन करण्याची रचनात्मक क्षमता पुलात आधीच ठेवण्यात आली आहे. झुआरी पुलाचेही बांधकाम दिलीप बिल्डकॉननेच केले आहे.

Zuari Twin Towers
Zuari River: झुवारी नदीचा फाटा बंद होण्याची भीती, खारफुटीची झाडे नष्ट! मलनिस्सारण प्रकल्पासाठी नियम धाब्यावर बसवून काम

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने बिल्डकॉनला वेर्णा येथे वाणिज्य प्रकल्पासाठी जमीन देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सुरुवातीच्या काळात केवळ टॉवर्सवरून मिळणाऱ्या शुल्कातून खर्चाची भरपाई होणे कठीण जाईल, हे लक्षात घेता हॉटेल वा अॅम्युझमेंट पार्कसारख्या प्रकल्पासाठी ही जमीन दिली जाईल, जेणेकरून कंपनीला गुंतवणुकीतून उत्पन्न मिळवता येईल.

Zuari Twin Towers
New Zuari Bridge: नव्या झुवारी पुलाचे काँक्रीट कोसळले! वाहतूक कमी असल्याने दुर्घटना टळली, निकृष्ट दर्जाच्या कामाची चर्चा

दिलीप बिल्डकॉनशी करार!

या प्रकल्पासाठी राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग आणि दिलीप बिल्डकॉन यांच्यात आधीच औपचारिक करार करण्यात आला आहे. त्यामुळे झुवारी पुलाचे सौंदर्य व पर्यटनमूल्य अधिक वाढणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com