Arambol Panchayat: घरपट्टीत २० वर्षांनंतर सरकारी निर्देशानुसार होणार १० टक्के वाढ

Goa Arambol: ना हरकत दाखले प्रलंबित ठेवल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी
Goa Arambol: ना हरकत दाखले प्रलंबित ठेवल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी
Arambol Gram Sabha Dainik Gomantak
Published on
Updated on

पंचायत क्षेत्रातील घरपट्टी शुल्क साधारण वीस वर्षे न वाढविल्याचा शेरा वार्षिक अहवालात नोंदविल्याने सरकारने निर्देशित केल्यानुसार १० टक्के दरवाढीचा प्रस्ताव हरमल ग्रामसभेत सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला. तसेच बांधकामांना कोणत्या कारणासाठी ना हरकत दाखले प्रलंबित ठेवले याचा जबाब द्यावा, अन्यथा दाखले त्वरित जारी करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.

पंचायत सभागृहात सरपंच रजनी इब्रामपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यावेळी उपसरपंच अनुपमा मयेकर, पंच सोनाली माजी, संतान फर्नांडिस, सुशांत गावडे, दिव्या गडेकर, गुणाजी ठाकूर, भिकाजी नाईक व गटविकास खात्याच्या निरीक्षक करिष्मा दाभोलकर यांची उपस्थिती होती.

सचिव सुभाष कांबळी यांनी मागील सभेचा अहवाल सादर केला. सरकारच्या परिपत्रकानुसार घरपट्टी, व्यावसायिक शुल्क आदींची माहिती दिली. घरपट्टीसह अनेक विषयांवर सभेत चर्चा झाली. तसेच विविध ठराव संमत करण्यात आले.

Goa Arambol: ना हरकत दाखले प्रलंबित ठेवल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी
Arambol: हरमलच्या ‘स्वीट लेक’जवळ समुद्रात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

वेश्या व्यवसाय थांबवा

किनारी भागात रात्री आठनंतर नायजेरीयन युवतीचा वेश्या व्यवसाय फोफावला आहे. त्यास आवरण्याची मागणी नागरिक प्रमेश मयेकर व बॉस्को फर्नांडिस यांनी केली. दररोज रात्री त्यांच्यात मारामारी होत असते. त्यास आवर घालावा तसेच ज्या गेस्ट हाऊसमध्ये वास्तव्य करून असतात, त्याची तपासणी करावी व त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com