Crime News: प्रॉपर्टीच्‍या वादातून घरावर गोळीबार!

Crime News: नेसाय हादरले : रात्रीची घटना; एकाला अटक
Gun
Gun Dainik Gomantak
Published on
Updated on

Crime News: मालमत्तेच्‍या वादातून काल बुधवारी रात्री अकराच्या सुमारास नेसाय येथे गोळीबार होण्‍याची घटना घडली. या प्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी ‘ब्‍लॅक टायगर’ सुरक्षा एजन्‍सीचा मालक नीलेश वेर्णेकर याच्‍यासह तिघांवर गुन्‍हा नोंद केला आहे.

दरम्‍यान, संध्‍याकाळी उशिरा पोलिसांनी नीलेश वेर्णेकर याला अटक केली असून अन्‍य दोन संशयित फरार आहेत.

मिळालेल्‍या माहितीनुसार, काल बुधवारी रात्री सगळीकडे सामसूम असताना नेसाय येथे धामधूम सुरू झाले. त्‍यावेळी ११ वाजले होते. नेसाय येथील कॉन्सी फर्नांडिस यांच्या घरावर संशयितांनी तीन गोळ्या झाडल्या व नंतर आलेल्या गाडीतून पलायन केले.

Gun
Goa Power Consumption: घरगुती वीज वापरात गोवा अव्वल; आसाममध्ये सर्वात कमी वापर...

या गोळीबारात सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही. घटनास्थळी मायणा-कुडतरी पोलिसांना दोन गोळ्या सापडल्या आहेत.

कॉन्सी फर्नांडिस यांच्या घराजवळ एका खुल्या जागेवर बांधकाम करण्यात येत आहे. त्या बांधकामाविरोधात फर्नांडिस यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

या मालमत्तेच्या वादातूनच हे गोळीबाराचे प्रकरण घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत फर्नांडिस कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केली आहे.

संशयित चालवतो ‘ब्लॅक टायगर’ सुरक्षा एजन्सी

संशयित आरोपी नीलेश वेर्णेकर हा ‘ब्लॅक टायगर’ सुरक्षा एजन्सी चालवतो. त्‍याच्यासह आणखी दोघेजण गाडीतून कॉन्सी यांच्या घरासमोर आले आणि त्यांनी बंदुकीतून तीन गोळ्या झाडल्या.

यावेळी कॉन्सी यांचे कुटुंबीय घरातच होते. त्यानंतर घटनास्थळावरून गाडीने पळ काढला. कॉन्सी यांनी याबाबतची माहिती मायणा-कुडतरी पोलिसांना दिल्यावर लागलीच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

या संस्थांनी त्यांच्या संचालक मंडळाच्या बैठकांमध्‍ये त्‍यास मंजुरी द्यावी. त्यानंतर कर्जदाराने ६० दिवसांच्या आत निश्‍चित रक्कम भरणे आवश्यक आहे. ओटीएस योजना २५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या थकबाकीची परतफेड करण्यासाठी आहे.

कृषी किंवा सहकारी पतसंस्थांकडून अनेकजण कर्ज घेतात. मात्र त्‍यातील बहुतांश जणांना कर्ज फेडणे शक्य होत नाही. पतसंस्थांच्या कर्जाच्या थकबाकीत वाढ झाल्याने त्यांचा एनपीए (बिगरभांडवली मालमत्ता) वाढतो.

तो कमी करण्‍यासाठी एकत्र कर्ज भरणा योजना (ओटीएस) लागू केल्‍याची माहिती सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

सहकारी पतसंस्थांचा एनपीए कमी करणे आणि त्यांना निधी उपलब्ध करून देणे यासाठी सरकारने १० फेब्रुवारी २०२० रोजी ओटीएस योजना सुरू केली होती. ती ६ महिन्यांसाठी होती. मात्र कोविडमुळे तसेच इतर कारणांमुळे पतसंस्थांचे कर्जदार या योजनेचा लाभ घेऊ शकले नाहीत.

म्हणून सरकारने ओटीएस योजनेसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या तत्त्वांनुसार सहकारी पतसंस्थांनी कर्जदारांना ओटीएस लागू करणे आवश्यक

आहे.

पतसंस्थेने कर्जदाराचा ओटीएस अर्ज मंजूर केल्यास कर्जदाराला २ महिन्यांच्या आत २५ टक्के रक्कम भरावी लागेल. उर्वरित ७५ टक्के रक्कम पुढील ३० दिवसांत जमा करावी लागेल. पूर्ण निश्चित केलेली रक्कम ६० दिवसांच्या आत भरणे आवश्यक आहे.

सुवर्ण कर्जासाठी ओटीएस सोने तारण ठेवून कर्ज फेडणे शक्य आहे. तरीही कर्ज तारण ठेवलेल्या सोन्याच्या किमतीपेक्षा जास्त असल्यास १० टक्के रक्कम माफ करण्यास पतसंस्थेला मोकळीक आहे. यासाठी संचालक मंडळाची मंजुरी आवश्यक असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com