Goa Agriculture: काजू बागायतीत भाजीपाला, फळाफुलांचा मळा; पार्सेतील शेतकरी दाम्पत्याचा अभिनव प्रयोग

Morjim: साळगावकर दांपत्याने डोंगर माळरानावरील आपल्या काजू बागायतीत पालेभाज्यांबरोबरच फळाफुलांची लागवड करण्याचा नवा प्रयोग केला आहे.
Goa Agriculture
Goa AgricultureDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: काजू पिकाचा हंगाम हा केवळ दोन ते अडीच महिन्यांचा असतो, हा हंगाम संपल्यानंतर काजू बागायतीत दुसरे कोणते पीक घेतले जात नाही, परंतु याला फाटा देत पार्से येथील प्रगतशील शेतकरी तथा माजी सरपंच श्रीराम साळगावकर आणि त्यांची पत्नी प्रमिला यांनी आपल्या काजू बागायतीत भेंडी, वांगी, हळद, झेंडू फुले, वाल, काकडी, दोडकी, कारले आदींचा मळा फुलवून एक नवा आदर्श घातला आहे.

शेतकरी केवळ काजूच्या हंगामात बागायतीत जाऊन पीक घेतात. परंतु साळगावकर दांपत्याने डोंगर माळरानावरील आपल्या काजू बागायतीत पालेभाज्यांबरोबरच फळाफुलांची लागवड करण्याचा नवा प्रयोग केला आहे.

Goa Agriculture
Goa Contractual Teachers: कंत्राटी शिक्षकांसाठी 'गूड न्यूज'; कायम करण्‍यासाठी सरकार आखणार योजना, अपात्र शिक्षकांना घरी पाठवणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

याबाबत श्रीराम साळगावकर यांनी सांगितले की, काजू बागायतीत केवळे काजू हंगामातच नव्हे तर वर्षभर विविध पिके घेणे शक्य आहे. काजू बागायतीत भाजीपाला, कंदमुळे लागवड शक्य आहे. अंतर्गत पिकामुळे काजू बागायतही साफ राहते. साफसफाई खर्च कमी होतो, असे ते म्हणाले.

Goa Agriculture
Goa Assembly Session: वाचनालयांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवण्याचा विचार करू, CM सावंतांचे विधानसभेत आश्‍‍वासन

मिरची लागवड

या ठिकाणी नवीन मिरची लागवडीचा एक प्रकल्पही सुरू आहे. त्यासाठी आस्था कंपनीमार्फत आपल्याला रोपटे दिलेली आहेत. आपली पत्नी वेगवेगळ्या पालेभाज्या, फुलांची लागवड करण्यावर पूर्ण वेळ देते. तसेच मुलंही साथ देतात, असे साळगावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com