Taleigao Election Result: ताळगावमधून युनायटेड ताळगावकरचा सुफडा साफ, मंत्री बाबूश यांचे पॅनल विजयी

Taleigao VP Election Result: अकरा सदस्य संख्या असलेल्या ताळगाव पंचायतीचे चार सदस्य बिनविरोध निवडून आले होते, उरलेल्या तास जागांसाठी रविवारी मतदान पार पडले.
Taleigao VP Election Result
Taleigao VP Election ResultDainik Gomantak

Taleigao VP Election Result

ताळगाव पंचायतीच्या सात जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट फ्रंटने सर्व जागेवर विजय मिळवत युनायटेड ताळगावकरचा सुफडा साफ केला आहे. यापूर्वी बाबूश यांच्या पॅनलच्या चार जागेवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.

ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट फ्रंटने सर्व अकरा जागेवर विजय मिळवला असून, सरपंच पदासाठी नवा चेहरा देण्याचे आश्वासन मंत्री बाबूश यांनी दिले आहे.

ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट फ्रंटचे विजयी उमेदवार

प्रभाग क्रमांक 1 - सिद्धी राजेंद्र केरकर (बिनविरोध)

प्रभाग क्रमांक 2 - आग्नेल डिकुन्हा 1,403 मताधिक्याने विजयी

प्रभाग क्रमांक 3 - हेलिना परेरा 751 मतांनी विजयी

प्रभाग क्रमांक 4 - रतिका नरेंद्र गावस 692 मतांनी विजयी

प्रभाग क्रमांक 5 - उशांत काणकोणकर 493 मतांनी विजयी

प्रभाग क्रमांक 6 - इस्टेला डिसोझा (बिनविरोध)

प्रभाग क्रमांक 7 - जानू महादेव रोझारियो 1,101 मतांनी विजयी

प्रभाग क्रमांक 8 - मारीया फर्नांडिस 733 मतांनी विजयी

प्रभाग क्रमांक 9 - संजना दिवकर 854 मतांनी विजयी

प्रभाग क्रमांक 10 - सागर बांदेकर (एकमेव अर्ज असल्याने बिनविरोध)

प्रभाग क्रमांक 11 - सिडनी पाऊलो बर्रेटो (बिनविरोध)

Taleigao VP Election Result
Goa Loksabha: उत्तर, दक्षिणेत 6 अपक्ष उमेदवार कोण आहेत, कोणतं मिळालं चिन्ह? एकूण 16 उमेदवार रिंगणात

अकरा सदस्य संख्या असलेल्या ताळगाव पंचायतीचे चार सदस्य मंत्री बाबूश मोन्सेरात व आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या ‘ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट फ्रंट''चे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे सात जागांवर निवडणूक पार पडली.

ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट फ्रंटसमोर सर्वपक्षीय ‘युनायटेड ताळगावकर'' या आघाडीचे आव्हान होते. युनायटेड ताळगावकरने दहा जागांवर उमेदवार अपक्ष म्हणून उभे केले होते. परंतु त्यातील तिघांनी माघार घेतल्याने आमदार गटाचे तीन उमदेवार बिनविरोध निवडून आले. तर, एका प्रभागात एकच अर्ज असल्याने तेथील उमेदवार बिनविरोध निवडून आला.

सरपंचपदासाठी नवा चेहरा

सरपंचपदासाठी यावेळी नवा चेहरा देणार असल्याचे आश्वासन मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिले आहे. मी पणजी कधीच सोडणार नाही. कोणी कितीही स्वप्नं पाहीली तरी ती पूर्ण होणार नाहीत. माझा पक्षावर विश्वास आहे. ज्याच्याकडे लोक आहेत त्यालाच पक्षात किंमत आहे. जनमत असेल तरच पक्ष तिकीट देतो आणि माझ्याकडे लोकमत आहे हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय, अशी प्रतिक्रिया बाबूश मोन्सेरात यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com