Sahitya Sammelan : प्रा. सुरेश द्वादशीवार यांना संमेलन अध्यक्षपद नकोच!

परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. नरेंद्र पाठक यांची भूमिका
Sahitya Sammelan : प्रा. सुरेश द्वादशीवार यांना संमेलन अध्यक्षपद नकोच!
Published on
Updated on

Sahitya Sammelan : प्रा. सुरेश द्वादशीवार यांचे नाव आगामी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सुचवले जात असल्याची चर्चा आहे. मात्र, द्वेषमुलक भाषणे करणाऱ्या आणि तशीच मते असणाऱ्या माणसांना संमेलनाचे अध्यक्ष केले जाऊ नये, असे स्पष्ट मत अखिल भारतीय साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. नरेंद्र पाठक यांनी व्यक्त केले.

पाठक यांनी पत्रकाद्वारे सांगितले, की ‘ललित साहित्याचे बहुतांश लेखक हे उच्चवर्णीय होते. त्यांच्यावर सावरकरांच्या विचारांचा पगडा असल्याने ते गांधीविरोधी होते’, असे वक्तव्य द्वादशीवार यांनी नागपूर येथील कार्यक्रमात केले. आपल्यातील जातीधर्माचे यांच भेदाभेद मिटवून एकत्र आले पाहिजे, असा लोकांना उपदेश करणारे द्वादशीवार यांनी भाषणात मात्र भेदभावाला खतपाणीच घातले आहे. त्यांनी खांडेकर ते प्र.के. अत्रे यांच्यापर्यंत अनेकांची निंदा केली. न्यायालये अस्वच्छ झाली असून हिंदू मताची झाली आहेत, असे म्हणत अत्यंत अवमानकारक भाषण केले.

Sahitya Sammelan : प्रा. सुरेश द्वादशीवार यांना संमेलन अध्यक्षपद नकोच!
Mopa Airport : मुहूर्त पुन्हा लांबणीवर; ‘मोपा’वरून जानेवारीत उड्डाण

...तर ते कोणती दिशा दाखवणार?

द्वादशीवार अशी भाषणे करून समाजातील भेदांना उत्तेजन देणारी विषारी प्रवृत्ती निर्माण करत आहे, अशी टीका प्रा. नरेंद्र पाठक यांनी केली. साहित्याच्या उद्देश समाज तोडणे नसून समाज जोडणे आहे हे विसरून चालणार नाही. साहित्य संमेलनाचा अध्यक्षच जर भेदाला उत्तेजन देणारा असेल तर ते साहित्य संमेलन समाजाला कोणती दिशा दाखवणारे असेल?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com