Waste Process: कचरा प्रक्रियेतून कंपोस्ट खताची निर्मिती : मार्टिन्स

Waste Process: राज्यभरात विविध ठिकाणी अनेक वर्षे साठवून ठेवलेल्या ४ लाख ५२ हजार ६२२.७१ घनमीटर कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे.
Waste Process
Waste ProcessDainik Gomantak
Published on
Updated on

Waste Process: राज्यभरात विविध ठिकाणी अनेक वर्षे साठवून ठेवलेल्या ४ लाख ५२ हजार ६२२.७१ घनमीटर कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे. गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक लेविन्सन मार्टिन्स यांनी ही माहिती दिली.

Waste Process
Eczema During Pregnancy: गर्भधारणेनंतर एक्जिमाने त्रास्त आहात? तर मग करा हे घरगुती उपाय

प्रक्रिया करता न येणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम आता हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कचरा प्रक्रियेतून 2 लाख 525 घनमीटर कंपोस्ट खताची निर्मिती केली आहे. मार्टिन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, पणजी शहर हद्दीत तीन ठिकाणी साठवलेला कचरा होता.

Waste Process
Olive Oil Benefits: तुमच्या त्वचेसाठी ऑलिव्ह ऑईल वरदान आहे, जाणून घ्या कसे?

कांपाल येथे ५ हजार ३०५ घनमीटर तर पाटो येथे २ हजार ६०६ तर दिवजा सर्कल येथे ५६९ घनमीटर कचरा साठवून ठेवण्यात आला होता. त्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे. मडगावातील सोनसडो येथील १ लाख ७२ हजार १७८.७१ घनमीटर कचऱ्यावर प्रक्रिया केली आहे.

हेडलॅण्ड सडा येथील ९६ हजार ५३० घनमीटर तर आसगाव येथील १ लाख ५५ हजार ३३३ घनमीटर कचऱ्यावरदेखील प्रक्रिया केली आहे. कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील ४ हजार ९५५ घनमीटर, काणकोण येथील ३ हजार १२९, कुडका येथील ८ हजार, लाखेरे-डिचोली येथील ३ हजार ७०० तर पेडणे येथील ३१७ घनमीटर कचऱ्यावरील प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com