Priyanka Chopra In Goa: उकडलेला भात, कॅरम आणि बीच वॉक; प्रियांकानं शेअर केले 'गोवा व्हेकेशन'चे PHOTO, पाहून तुम्हीही व्हाल 'Chill'

Priyanka Chopra: बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा सध्या भारतात परतली असून, ती आपल्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.
Priyanka Chopra In Goa
Priyanka Chopra In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा सध्या भारतात परतली असून, ती आपल्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील तिचा दमदार फर्स्ट लुक समोर आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा प्रियांका चर्चेचा विषय ठरली आहे, कारण हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये आयोजित ‘वाराणसी’ इव्हेंटदरम्यान ती ट्रेडिशनल अवतारात दिसून आली होती. तिच्या या लुकची सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली.

दरम्यान, व्यस्त शूटिंग शेड्यूलमधून थोडा वेळ काढत प्रियांका गोव्यात मिनी व्हेकेशन एन्जॉय करत आहे. गोवा हे तिच्या आवडत्या पर्यटन स्थळांपैकी एक असल्याचं तिने याच निमित्ताने सांगितलं.

गोव्यातील आदरातिथ्य, सोज्वळ लोक, फूडी कल्चर आणि प्रेमळ संस्कृती हाच या ठिकाणाचा सर्वात मोठा आकर्षणबिंदू असल्याचं तीने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये नमूद केलं. “गोवा प्रत्येक बाबतीत अपवादात्मक आहे,” अशा शब्दांत तिने या गोवाबद्दलचं प्रेम व्यक्त केलं.

सुट्टीदरम्यान प्रियांका चोप्राने गोव्यातील स्थानिक खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेतल्याचं दिसून आले. तिने पारंपरिक गोअन पदार्थांसोबत खास सीफूडची चव चाखल्याचे अनेक फोटो तिने पोस्ट केले आहेत.

केवळ निसर्गसौंदर्यच नव्हे तर गोव्याच्या जेवणातील प्रामाणिक चव हा अनुभव विशेष बनवणारा असल्याचं तिने नमूद केलं. याशिवाय तिने कॅरमचा खेळ खेळत रिलॅक्सेशन वेळ घालवल्याचे फोटोज तिच्या फन-मोड व्हेकेशनची साक्ष देतात.

प्रियांकाने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत असून चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचं आणि साधेपणाचं कौतुक केलं आहे. अनेकांनी तिच्या पोस्टवर कमेंट करत, “देसी गर्लचा देसी अंदाज पुन्हा पाहायला मिळतोय”, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिच्या फॅन्सना आता तिच्या आगामी चित्रपटाची उत्सुकता अधिक लागली आहे.

सध्या प्रियांका चोप्रा भारतात काही वैयक्तिक आणि व्यावसायिक कारणांसाठी आली असून, चित्रपट, इव्हेंट्स आणि ब्रँड एंडोर्समेंट्सच्या प्रोजेक्ट्सवरही ती काम करत आहे. जागतिक पातळीवर आपलं स्थान निर्माण करणारी ही अभिनेत्री जेव्हा भारतात परतते तेव्हा प्रत्येक पाऊल चर्चेचा विषय ठरतो आणि या वेळीही गोव्यातील तिच्या सुट्टीने सोशल मीडियावर नवा ट्रेंड तयार केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com