Goa News: म्हापसा नगराध्यक्षपदी प्रिया मिशाळ ?

म्हापसा नगराध्यक्ष या पदासाठी सत्ताधारी गटाने नगरसेविका प्रिया मिशाळ यांचे नाव निश्चित केले आहे.
Goa News|Mapusa Municipality
Goa News|Mapusa MunicipalityDainik Gomantak

Goa News: येथील नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी येत्या मंगळवारी 31 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. या पदासाठी सत्ताधारी गटाने नगरसेविका प्रिया मिशाळ यांचे नाव निश्चित केले आहे.

दरम्यान, नगराध्यक्षपदाची निवडणूक होताच प्रभारी नगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर हे उपनगराध्यक्ष पदावरुन पायउतार होतील. त्यामुळे या उपनगराध्यक्षपदी नगरसेवक विराज फडके यांची वर्णी लागणार असून सत्ताधाऱ्यांनी फडके यांच्या नावास पसंती दर्शविली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, शनिवारी उपसभापती तथा स्थानिक आमदार जोशुआ डिसोझा यांच्या अध्यक्षतेखाली खासगीत अंतर्गत बैठक झाली. सदर बैठकीत नगराध्यक्ष पदाच्या नावावर चर्चा झाली.

या पदासाठी जरी नगरसेविका प्रिया मिशाळ व नगरसेविका डॉ. नूतन बिचोलकर यांच्या नावाची चर्चा होती, तरी या बैठकीत फक्त प्रिया मिशाळ यांच्याच एकमेव नावावर चर्चा झाली. सत्ताधाऱ्यांनी एकमताने मिशाळ यांच्या नावास पसंती दर्शविली.

Goa News|Mapusa Municipality
Goa Railway: गोव्यात रेल्वे मार्ग दुपदरीकरण प्रस्तावाला पर्यावरणप्रेमींचा कडाडून विरोध कारण...

एकूण वीस नगसेवकांपैकी 14 नगरसेवकांचे संख्याबळ आहे. या नगराध्यक्षपदासाठी येत्या 31 जानेवारी सकाळी 11 वाजता म्हापसा पालिकेत निवडणूक होणार आहे. तर दि. 30 जानेवारी दुपारपर्यंत या पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आहे.

निवडणूक होताच विद्यमान प्रभारी नगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर हे आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा देतील. त्यांच्या जागी उपनगराध्यक्ष म्हणून नगरसेवक विराज फडके यांच्या नावाची एकमताने निश्चिती करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com