Goa Politician Scandal: मंत्री गुदिन्होंची वास्को पोलिसांत तक्रार; अज्ञाताने बदनामी केल्याचा आरोप

एक मंत्री सेक्स स्कॅन्डलमध्ये गुंतला असल्याचे काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी ट्विट केले होते
Goa Assembly Session | Mauvin Godinho
Goa Assembly Session | Mauvin Godinho Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Cabinet Minister Involved In Sex Scandal Congress Shared News: विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अज्ञात व्यक्तींकडून खोट्या बातम्या पसरवून मंत्री माविन गुदिन्हो यांच्या प्रतिमेला आणि प्रतिष्ठेला नुकसान पोहोचवल्याबद्दल अज्ञाताविरुध्द वास्को पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार मंत्री गुदिन्हो यांच्या खासगी सचिवाने दाखल केली आहे.

तसेच या प्रकरणी त्या महिलेने वास्को पोलीस स्थानकात अज्ञाता विरोधात तक्रार दिली असून आपला फोटो समाज माध्यमावर अपलोड करून आपली बदनामी केली जात असल्याची तक्रार दाखल केली आहे.

Goa Assembly Session | Mauvin Godinho
गोवा कॅबिनेट मंत्र्याचा सेक्स स्कँडल, अपहरणात समावेश? पंच महिलेशी चाळे, चोडणकरांनी शेअर केली खळबळजनक बातमी

कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे कायम निमंत्रित गिरीश चोडणकर यांनी ट्विटरवर आणखी एक मंत्री सेक्स स्कॅन्डलमध्ये गुंतला आहे का, याचे उत्तर मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि भाजपने द्यावे, अशी मागणी केली होती.

त्यांनी सोबत जोडलेल्या कात्रणात म्हटले आहे की, बंदराच्या शहरात एका शक्तिशाली राजकारण्याने वाढदिवसाच्या मेजवानीनंतर एक तरुण पंचसदस्य महिलेला आपला खरा रंग दाखवल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

Goa Assembly Session | Mauvin Godinho
Goa Politician Scandal: तुमच्या नात्यातील कुठल्याही स्त्रीची अशी नाहक बदनामी झाली असती तर तुम्हाला चालले असते?

मंत्री गुदिन्‍हो यांच्‍या कार्यालयातून त्‍यांच्या साहाय्यक सचिव नेहल केणी यांनी एक तक्रार दिली आहे. त्यात म्‍हटले आहे की, ‘चोडणकर यांच्या त्या ट्विटनंतर मंत्री गुदिन्हो यांचा फोटो एका स्थानिक राजकारणी महिलेसोबत जोडून त्यांची बदनामी करणारा मजकूर समाज माध्यमावर फिरत आहे.

या आरोपात कुठलेही तथ्य नसून मंत्र्यांची बदनामी करण्याच्या इराद्याने हे सर्व कृत्य केले गेले आहे. या संबंधी काही आक्षेपार्ह व्हिडिओही प्रसारित करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मंत्र्यांची हेतूपूरस्सर बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आणि आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याबद्दल संबंधितावर गुन्हा नोंद करून कारवाई करावी’.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com