Goa Board Student: बहिस्थ विद्यार्थ्यांची बेशिस्त वाढली; मंडळाकडे तक्रारी

Goa Board Student: शिस्तभंगाच्या कारवाईची मुभा
Goa Teacher and Student
Goa Teacher and StudentDainik Gomantak

Goa Board Student: बहिस्थ विद्यार्थी (खासगी उमेदवार) म्हणून दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या आणि वर्गात बसू दिलेल्या विद्यार्थ्यांची बेशिस्त आता अनेक ठिकाणी तापदायक ठरू लागली आहे.

तशा तक्रारी विद्यालयांकडून गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे (GBSHSE) येऊ लागल्यानंतर आता अशा विद्यार्थ्यांना वर्गात बसवणे बंधनकारक नाही असे शिक्षण मंडळाने विद्यालयांना कळवले आहे.

त्यामुळे या विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाची कारवाई कशी करावी असा विद्यालय प्रमुखांना पडलेला प्रश्न सुटला आहे.

नववी आणि अकरावीत नापास झालेल्यांना बहिस्थ विद्यार्थी म्हणून दहावी आणि बारावीची परीक्षा देण्याची मुभा यंदापासून मंडळाने दिली आहे.

त्यासाठी ज्या विद्यालयात जे विद्यार्थी नववी आणि अकरावीत नापास झाले असतील, त्याच विद्यालयाच्या माध्यमातून बहिस्थ विद्यार्थी म्हणून त्यांची या परीक्षेसाठी नोंदणी करण्याची व्यवस्था मानवतेच्या दृष्टिकोनातून केली होती.

त्या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीच्या नियमित वर्गात बसू द्यावे असेही मंडळाने विद्यालय प्रमुखांना कळवले होते. त्यामुळे नववीतील नापास विद्यार्थी दहावीच्या वर्गात, तर अकरावीतील नापास विद्यार्थी बारावीच्या वर्गात बसत होते.

नियमित विद्यार्थ्यांसोबत या विद्यार्थ्यांना विद्यार्जन करता यावे असा उदात्त हेतू मंडळाने बाळगला आहे.

मंडळाच्या सूचनेनुसार या विद्यार्थ्यांना बहिस्थ असूनही वर्गात बसू दिले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात कशी कारवाई करावी असा शाळा व्यवस्थापनाला प्रश्न पडला होता.

त्यांनी हा विषय मंडळाच्या नजरेस आणून दिल्यानंतर बेशिस्त विद्यार्थ्यांना वर्गात बसवणे बंधनकारक नाही असे कळविले आहे.

Goa Teacher and Student
Goa Accident News: कुचेलीत स्वयं अपघातात कारची विजेच्या खांबाला धडक; चालक-सहप्रवासी जखमी

समज ठरला खोटा

दहावी, अकरावीच्या वर्गात बसण्यास मिळालेल्या विद्यार्थ्यांना आपण विद्यालयाचे नियमित विद्यार्थी नाही याची जाणीव आहे. आपण बहिस्थ विद्यार्थी असल्याने आपण कसेही वागलो तरी शाळा व्यवस्थापन आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई करू शकणार नाही असा त्यांचा समज झाला होता.

त्यापैकी काही जणांनी वर्गात मस्ती करणे, वर्गाबाहेर इतर विद्यार्थ्यांना सतावणे, शिक्षकांना शिकवताना अडथळे आणणे असे प्रकार करणे सुरू केले होते.

माणुसकीच्या निर्णयाचा गैरफायदा

मंडळाने माणुसकीच्या दृष्टिकोनातून घेतलेल्या निर्णयाचा गैरफायदा काही विद्यार्थी घेत असल्याचे आढळून आल्याने त्यांना वर्गात न बसवल्यास मंडळ विचारणा करणार नाही असे मंडळाकडून शाळांना कळविण्यात आले आहे.

बहिस्थ विद्यार्थ्यांना वर्गात बसवणे शाळांना बंधनकारक नाही असे मंडळाने कळवल्याने आता तापदायक विद्यार्थ्यांच्या तावडीतून दहावी आणि बारावीच्या वर्गाची सुटका होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com