Khandola News : ‘प्रियोळ’चा सर्वांगिण विकास करणार : गावडे

Khandola News : गणेशनगरात संरक्षक भिंत बांधकामांचे शुभारंभ
priole
prioleDainik Gomantak

Khandola News : खांडोळा, सर्वांच्या सहकार्यांतून प्रियोळ मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करण्यात येईल. पंच, सरपंच, जिल्हा पंचायत आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने, विचारांने आवश्‍यकतेनुसार विकास कामे करण्यात येणार आहेत, असे मत खांडोळा गणेश नगरत संरक्षण भितींच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी व्यक्त केले.

यावेळी जिल्हा पंचायत सदस्य श्रमेश भोसले, सरपंच विशांत नाईक, जयेश नाईक, पंच मनोज गावकर, प्रियोळ प्रगती मंचचे किशोर गावकर, गणेशनगर क्रीडा मडळाचे अध्यक्ष अभिषेक तिळवी व ग्रामस्थ उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, गणेश नगरात संरक्षणक भिंतीची मागणी अनेक वर्षांपासूनची होती. येथील जागृती नागरिक, गणेश नगर क्रीडा क्लबतर्फे ही मागणी मांडण्यात आली.

priole
Today's Goa News Live: राज्यातील महत्वाच्या घडमोडी वाचा एका क्लिकवर

त्यानुसार या कामांची सुरवात आज करण्यात आली असून लवकरच या ठिकाणी प्रशस्त संरभक भिंत उभारण्यात येईल.

या शिवाय येथील ज्येष्ठ नागरिकांसाठीही इतर सुविधा उभारण्यात येणार आहेत. या भागातील गटार व्यवस्थाही करण्यात येईल. यावेळी मंत्री गावडे याच्या हस्ते नारळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com