Today's Goa News Live: राज्यातील महत्वाच्या घडमोडी वाचा एका क्लिकवर

Goa News Updated in Marathi (12 February 2024): पणजी, म्हापसा, मडगाव तसेच राज्यातील महत्वाच्या घडमोडी....
Goa Batmya Live (12 Feb 2024) in Marathi | Latest News From Panji, Mhapsa, Madgaon and Overall Maharashtra
Goa Batmya Live (12 Feb 2024) in Marathi | Latest News From Panji, Mhapsa, Madgaon and Overall MaharashtraDainik Gomantak

देवदर्शनाची पहिली रेल्वे वास्को स्थानकाहून रवाना

राम भक्तांना घेऊन अयोध्या देवदर्शनाची पहिली रेल्वे वास्को स्थानकाहून रवाना. राज्यसभा खासदार सदानंद शेटतानावडे, समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार कृष्णा साळकर, आमदार संकल्प आमोणकर यांच्या उपस्थित गोव्यातील राम भक्तांनी रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा

गतिरोधकांचा अंदाज न आल्याने धारबांदोडा येथे अपघात; एकजण ठार तर एक जखमी

धारबांदोडा येथील उपजिल्हाधिकारी कार्यालय समोर गतिरोधकाचा अंदाज न आल्याने दुचाकीचा अपघात झाला असून यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय. निफा फर्नांडीस (रा. रिवण) असे त्या व्यक्तीचे नाव असून स्कुटर चालक जॉली फर्नांडीस (रा. उगे) हा युवक किरकोळ जखमी झालाय. या मार्गावर होणाऱ्या सततच्या अपघातांमुळे स्थानिकांकडून उद्या रस्ता रोको करण्यात येणार आहे.

गोवा-वेल्हा येथे कार आणि ट्रकचा अपघात, कारचालक जखमी

गोवा-वेल्हा येथे कार आणि ट्रकचा अपघात, या अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गोव्यात काँग्रेसने कॅसिनो आणले नाहीत, कॅसिनो आले त्यावेळी सरकारमध्ये होते पर्रीकर - अमित पाटकर

गोव्यात काँग्रेसने कॅसिनो आणले नाहीत, कॅसिनो आले त्यावेळी पर्रीकर सरकारमध्ये होते, असे वक्तव्या गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केले आहे.

सभापती रमेश तवडकर यांच्यावर काँग्रेसची टीका

सभापती रमेश तवडकर यांच्यावर काँग्रेसने टीका केली आहे. धिवेशनात सभापती रमेश तवडकर यांनी “सभापती” न होता “पक्षपाती” बनून कामगिरी बजावल्याचा टोला काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी हाणला आहे.

प्रा. हेमंत अय्या यांना मेघश्याम नायक स्मृती युवा साहित्य पुरस्कार

गोवा कोकणी अकादमीद्वारे देण्यात येणारा मेघश्याम नायक स्मृती युवा साहित्य पुरस्कार प्रा. हेमंत अय्या यांना जाहीर.

धामसे सत्तरी येथील रस्ता अडविल्याप्रकरणी तलाठी म्हाळशेकर यांना नोटीस

धामसे सत्तरी येथील पारंपारिक रस्ता अडविल्याप्रकरणी सत्तरी तालुका संयुक्त मामलेदार विष्णू राणे यांची तलाठी मिलिंद म्हाळशेकर यांना नोटीस. येत्या 21 रोजी प्रकरणाची सुनावणी.

IPL 2024 पूर्वी महेंद्रसिंग धोनी पत्नी साक्षीसह गोव्यात; फोटो, व्हिडिओ व्हायरल

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पत्नी साक्षीसह गोव्यात आला आहे. धोनीसोबत त्याचे खास मित्र देखील आहेत. धोनीचे गोव्यातील फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.

आयपीएल 2024 (IPL 2024) पूर्वी धोनीचा गोवा दौरा चर्चेत आला असून, त्याचे गोवा ट्रीपचे फोटो व्हायरल होत आहेत.

राज्यातील एड्स रुग्णांमध्ये 7 टक्क्यांहून अधिक वाढ...

गोव्याचे आरोग्य खाते एकीकडे अधिक प्रगती करत असताना राज्यातील एचआयव्ही रुग्णांची संख्या चिंताजनक बनली आहे. 2023 मध्ये 260 नवीन एचआयव्ही+ रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या 2022 च्या तुलनेत 7 टक्क्यांहून अधिक आहे.

गोवा वेल्हा महामार्गावर भीषण अपघात; चालक जखमी

गोवा वेल्हा येथील महामार्गावर भीषण अपघात. कारची एका पिकअपला जोरदार धडक बसली. यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालक जखमी झाला आहे. चालकाला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

म्हादईचे पाणी वळवण्यात कर्नाटकला यश मिळतंय, कारण...

कळसा प्रकल्पातून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह कर्नाटकात वळवण्यात आला. गोव्याने इंटर लॉटेकरी अर्जाद्वारे वळवलेल्या पाण्याची संयुक्त पहाणी करण्याची मागणी केली; पण ती अजून झालेली नाही. आज (ता.12) 'प्रवाह'ची बैठक होणार असून या पहाणीबाबतचा अजेंडा नाही.

कर्नाटक वेगवेगळ्या मार्गाने म्हादईचे पाणी वळवू पाहत आहे आणि त्यांच्या प्रयत्नांना यश देखील मिळताना दिसतंय. पर्यावरण तज्ञ राजेंद्र केरकर यांची माहिती

रणजी क्रिकेट: गोव्याचा पुन्हा पराभव

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट क गटात गोव्याला सलग तिसऱ्या, तर एकंदरीत सहाव्या सामन्यात चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. आनंद पांडे (9-71) याच्या भेदक फिरकीमुळे रेल्वे संघाचा 63 धावांनी विजय. गोवा दुसऱ्या डावात सर्वबाद 242.

विठ्ठलापूर-कारापूर येथे जलवाहिनी फुटल्याने पाण्याची नासाडी!

रविवारी (ता. 11) रात्री विठ्ठलापूर-कारापूर येथे जलवाहिनी फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी. जलवाहिनी त्वरित दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी

केरयान खांडेपार येथे खाजगी बसचा अपघात

केरयान खांडेपार येथे खाजगी बसचा अपघात. प्राथमिक माहितीनुसार, चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दुभाजकावर आदळली. अधिक माहितीच्या प्रतिक्षेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com