Vegetables In Goa: मिरचीने गाठले शतक; लिंबांना मागणी

Vegetables In Goa: भाज्यांचे दर वाढले : सामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री
Vegetables Price
Vegetables PriceDainik Gomantak
Published on
Updated on

Vegetables In Goa:

राज्यात मागील दोन आठवड्यांपासून भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कांदा आणि बटाटा वगळल्यास इतर भाज्या महागल्या आहेत. मिरचीने शतक गाठले असून, वालपापडी, भेंडी तसेच इतर पालेभाज्यांचे दरदेखील वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे.

दोन आठवड्यांपूर्वी आले-लसूणच्या दराचा भडका उडाला होता. लसूण 450 तर, आले 150 रुपये किलो दराने विकले जात होते. मात्र, लसूण आणि आल्याच्या दरात घट झाली आहे.

राज्यात काही दिवसांपासून उष्मा जाणवत आहे. त्यापासून बचावासाठी नागरिक लिंबू पाणी, सरबत, फळांचा रस, शीतपेये खरेदी करू लागले आहेत. परंतु लिंबू व इतर रसदार फळांची मागणी वाढताच त्यांच्या दरातही वाढ झाली असून उत्तम दर्जाचे, मध्यम आकाराचे लिंबू पाच ते सात रुपये प्रतिनग विकले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com