Mahadayi Water Dispute : म्हादईसाठी 20 मे रोजी पणजीत मानवी साखळीचे आयोजन

हेरिटेज ॲक्शन ग्रुप सक्रीय; विविध उपक्रम
Press Conference On Mahadayi Water Dispute
Press Conference On Mahadayi Water DisputeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

कर्नाटककडून म्हादईचे पाणी वळविण्याच्या प्रयत्नांविरोधात आता ‘सेव्ह गोवा-सेव्ह म्हादई फ्रंट’च्या आंदोलनाला हेरिटेज ॲक्शन ग्रुपने पाठिंबा दर्शविला असून 20 मे रोजी पणजीत मानवी साखळीचे आयोजन केले आहे.

म्हादय आमची माय’ या फेस्टिव्‍हलचा हा भाग असेल, अशी माहिती प्रसिद्ध इतिहासतज्‍ज्ञ हेता पंडित यांनी आज दिली. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे

केंद्रीय जलआयोगाने कळसा-भांडुरा प्रकल्पाचे पाणी कर्नाटकात वळविण्यासाठी दिलेल्या डीपीआर मंजुरीनंतर राज्यभर असंतोष कायम आहे. त्यातच कर्नाटकातील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप आणि काँग्रेसने हे पाणी वळवण्यासाठी आमचे प्राधान्याचे प्रयत्न असतील असे जाहीर केल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.

Press Conference On Mahadayi Water Dispute
Accident In Goa : राज्यात अपघातांचे सत्र सुरुच; ओल्ड गोवा येथे कार पलटी

दुसरीकडे हे प्रकरण न्यायालयात सुनावणीसाठी आहे. असे असताना राजकीय नेत्यांचे हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी ‘सेव्ह गोवा-सेव्ह म्हादई फ्रंट’ला आता हेरिटेज ॲक्शन ग्रुपची मदत मिळाली आहे. २० मे रोजी विविध संघटनांच्या वतीने मानवी साखळीचे आयोजन केले आहे. त्‍यास नागरिकांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन प्रा. प्रजल साखरदांडे यांनी केले आहे

करंजाळे ते सांता मोनिका जेटीपर्यंत उपक्रम

‘सेव्ह गोवा-सेव्ह म्हादई फ्रंट’ आणि ‘हेरिटेज ॲक्शन ग्रुप’च्या वतीने 20 मे रोजी मानवी साखळीबरोबर विविध उपक्रम राबवले जातील. ही मानवी साखळी करंजाळे ते सांता मोनिका जेटी या सात किलोमीटर अंतरापर्यंत असेल. विविध क्षेत्रांतील कलाकार, मच्छीमार, शेतकरी, कार्यकर्ते त्‍यात सहभागी होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Dairy management takeover by NDDB
AI Regulation in India
Dadu Mandrekar Biography
Karnataka Supreme Court Cases
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com