President Droupadi Murmu Goa Visit
आजपासून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसीय गोवा दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.
प्रतिबंधित रहदारीमुळे मंगळवारी संध्याकाळी दाबोळी विमानतळावरून उड्डाणे असणाऱ्यांना विमानतळावर लवकर पोहोचण्याचे आवाहन गोवा पोलिसांनी केले आहे.
राज्य पोलिसांनी जारी केलेल्या अॅडव्हायझरीमध्ये असे म्हटले आहे की, दाबोळी ते दोना पावला आणि पुढे पणजी शहरातील रस्त्यावरील वाहतूक मंगळवारी दुपारी 3.15 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मर्यादित असेल.
राज्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी सोमवारी ट्विटरवर पोस्टद्वारे माहिती दिली की, 'माननीय राष्ट्रपतींच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, ज्या प्रवाशांना दाबोळी येथून उड्डाण करायचे आहे, ज्यांच्या संध्याकाळी 5, 6 आणि संध्याकाळी 7 वाजता फ्लाईट आहेत त्यांनी दुपारी 3.30 पर्यंत विमानतळावर पोहोचणे आवश्यक आहे. कारण दाबोळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुपारी 3.45 नंतर वाहतूक प्रतिबंधित केली जाणार आहे.'
NH 566 दाबोळी विमानतळ ते वेर्णा
NH 66 वेर्णा ते बांबोळी
गोवा मेडिकल कॉलेज ते दोना पावला
दोना पावला ते मिरामार
मिरामार सर्कल ते बांदोडकर पुतळा
राजभवन ते बांबोळी
NH 66 बांबोळी ते पर्वरी
अटलसेतू
राष्ट्रपती मंगळवारी तीन दिवसांच्या दौऱ्यावेळी राज्य विधानसभेला संबोधित करतील आणि गोवा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभातही सहभागी होणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.