'...तर फलोत्पादनचे परवाने रद्द करु'

नियमावलीचे पालन करा : गाळे बंद ठेवणाऱ्यांबाबत प्रेमेंद्र शेट आक्रमक
Premendra Shet
Premendra Shet Dainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा : राज्य फलोत्पादन महामंडळाकडून या विभागाचे गाळे चालविण्यासाठी परवाने दिले जातात. या गाळ्यांसाठी महामंडळाने काही नियमांवली बनविली आहे. परंतु, महामंडळाकडून या मार्गदर्शक सूचींचे पालन होत असूनही ती व्यक्ती स्वतःच्या मर्जी किंवा चुकीमुळे जर गाळा बंद ठेवत असल्यास त्यांचे परवाने रद्द केले जातील, असा इशारा महामंडळाचे चेअरमन तथा मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी दिली.

म्हापशात फलोत्पादनच्या विक्रेत्यांसोबत रविवारी घेतलेल्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. या बैठकीस व्यवस्थापकीय संचालक चंद्रहास देसाई व अधिकारी रघुनाथ जोशी हे हजर होते.

फलोत्पादन महामंडळाकडे पुरेसा कर्मचारी वर्ग आहे. यामध्ये महामंडळ रस्ते निरीक्षकांचा सुद्धा समावेश आहे. या निरीक्षकांना त्यांच्या जबाबादारीनुसार यापुढे मार्गावर येणाऱ्या भाजीपुरवठा वाहनांची तपसाणी करण्यास मोकळीक देणार आहे. जर एखादे गाडी निकृष्ट दर्जाची भाजीपुरवठा वाहतूक करीत असल्याचे आढळल्यास, त्याचक्षणी ती भाजी नाकारत माघारी पाठविली जाईल, असे प्रेमेंद्र शेट यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले.

Premendra Shet
गोव्यात भाजपचं सरकार भक्कम; आमदार फुटीमध्ये तथ्य नाही

गोव्यात निकृष्ट भाजीपुरवठा होतो, असे आरोप यापूर्वी वरचेवर झाले, असे विचारले असता शेट म्हणाले की, या आरोपांत तथ्य असण्याची शक्यता नाकरता येत नाही. मध्यंतरी मी बेळगावला जाऊन याची माहिती घेत पाहणी केली. त्यावेळी संबंधित भाजी पुरवठादारांसोबत बैठकही घेतली. तेव्हापासून, यात काहीसा बदल दिसत असल्याचे शेट यांनी मान्य केले.

शेट म्हणाले की, गोव्यातील भाजी पुरवठ्यामध्ये आम्हाला यात शंभर टक्के सुधारणा हवी आहे. यापुढे भरारी पथकांच्या माध्यमातून अशा भाजीपुरवठा वाहतूकीवर नजर ठेवण्याची जबाबदारी सोपविली जाईल. जेणेकरून गोव्यात ही वाहने येताच त्यांची तपासणी केली जाईल, असेही प्रेमेंद्र शेट म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com