Pratima Coutinho, Verna Police
Pratima Coutinho Dainik Gomantak

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Pratima Coutinho: कुठ्ठाळीचे भाजप गटाध्यक्ष नारायण नाईक, सुनील गावस व रोकोझिन वालीस यांना तत्काळ अटक करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या ॲड. प्रतिमा कुतिन्हो यांनी वेर्णा पोलिस पोलिस उपनिरीक्षक आनंद गावकर यांची भेट घेऊन केली.
Published on

Bhutani Infra Project Sancoale Premanand Naik Protest Pratima Coutinho

वास्को: कुठ्ठाळीचे भाजप गटाध्यक्ष नारायण नाईक, सुनील गावस व रोकोझिन वालीस यांना तत्काळ अटक करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या ॲड. प्रतिमा कुतिन्हो यांनी वेर्णा पोलिस पोलिस उपनिरीक्षक आनंद गावकर यांची भेट घेऊन काल केली. यावेळी त्‍यांच्‍यासमवेत सांकवाळच्या सुमारे तीस महिला उपस्‍थित होत्‍या.

माजी सरपंच नारायण नाईक व रोकोझिन वालीस तसेच त्यांचा सहकारी सुनील गावस यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पण अजूनही कारवाई झालेली नाही.

सांकवाळचे माजी सरपंच प्रेमानंद नाईक हे भूतानी प्रकल्पाविरुद्ध बेमुदत उपोषण करत असल्याचे नाटक करत आहेत हे उघड करण्यासाठी शौचालयातील जो व्हिडिओ सांकवाळच्या दोघा माजी सरपंचांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर प्रसारित केला तो प्रकार त्यांच्याच अंगलट आला आहे. महिलांनी केलेल्या तक्रारीनुसार वेर्णा पोलिसांनी नाईक, वालीस व गावस या तिघांवर विनयभंगाचा गुन्हा नोंद केला आहे. कारण त्या शौचालयाचा वापर महिलांनीही केला होता.

Pratima Coutinho, Verna Police
Bhutani Project: ...तर संपूर्ण गोवा पेटून उठेल! ‘भूतानी’विरुद्ध उपोषणाचे सरकारला गांभीर्य नाही; चोडणकरांचा आरोप

‘भूतानी’ प्रकल्‍पाची मंजुरी ‘रेरा’ने तातडीने रद्द करावी

सांकवाळ येथील भूतानी प्रकल्पाला दिलेली मंजुरी ‘रेरा’ प्राधिकरणाने रद्द करावी अशी मागणी ‘गोवा बचाव’ अभियानाने केली आहे. संयोजक सबिना मार्टिन्स आणि सचिव रेबोनी साहा यांनी तसे पत्रक जारी केले आहे.

भूतानी प्रकल्पात अनियमितता असल्याने ‘रेरा’ प्राधिकरणाने या प्रकल्पाचे स्वतःहून परीक्षण करून त्याची मंजुरी रद्द करण्याची मागणी करण्‍यात आली आहे. या प्रकल्पात माहितीचा अभाव आहे, ज्यामुळे अनेक खरेदीदारांची दिशाभूल होऊ शकते. नोव्हेंबरपर्यंत २२० पेक्षा अधिक खरेदीदारांनी यामध्ये गुंतवणूक केली आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com