गोव्यात विधानसभा निवडणूकीचं बिगुल वाजू लागलं आहे. यातच आता पर्ये मतदार संघ गोवेकरांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Health Minister Vishwajit Rane) यांच्याविरोधात पर्ये मतदार संघातून निडणूक लढवणार असल्याची घोषणा कॉंग्रेसचे जेष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांनी केली आहे.
दरम्यान, राज्यातील राजकीय वातावरण मागील काही दिवसांपासून वेगाने बदलत आहे. यातच आता कॉंग्रेसचे जेष्ठ प्रतापसिंह राणे यांनी मंगळवारी एक मोठी घोषणा केली. विधानसभा निवडणुकीच्या आगोदरच पर्ये विधानसभा मतदार संघातून निवडणुक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर प्रतापसिंह राणे आणि राज्यातील विद्यमान आरोग्यमंत्री तथा त्यांचे पुत्र विश्वजित राणे यांच्यात दिवसभर रणकंदन माजले.
शिवाय, आगामी विधानसभा निवडणूक कॉंग्रेसच्या उमेदवारीवरच पर्ये मतदार संघातून लढवावी, अशी मागणी कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांकडून मागील काही दिवसांपासून होत होती. आपण पर्ये मतदार संघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर घेतली असल्याचे प्रतापसिंह राणे यांनी बोलताना सांगितले. तर दुसरीकडे विद्यमान आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनीही यंदाची विधानसभा निवडणूक आपणही पर्ये मतदार संघातून लढवणार असल्याचे घोषणा केली. त्यानंतर पर्ये मतदारसंघ दिवसभर राज्याच्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू राहीला. पर्ये मतदारसंघ पुन्हा एकदा गाजणार असल्याच्या चर्चेनेही जोर धरला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.