Administrative Transfers 2024: लोलयेकर यांची अंदमान, तर प्रसन्न आचार्य यांची मिझोरामहून गोव्यात बदली!

Union Ministry of Home Affairs: केंद्रीय गृह मंत्रालयाने भारतीय प्रशासकीय आणि भारतीय पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी केला. त्यात या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
Goa Administrative Transfers 2024: लोलयेकर यांची अंदमान, तर गोमंतकीय अधिकारी प्रसन्न आचार्य यांची मिझोराममधून गोव्यात बदली!
Prasad lolayekar andaman Prasanna Acharya transfer from Mizoram to GoaDainik Gomantak
Published on
Updated on

शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांची अंदमान येथे, इमॅजीन पणजी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीत रॉड्रिग्स यांची लडाख येथे तर क्रीडा सचिव श्वेतिका सचन यांची दिल्ली येथे बदली झाली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने भारतीय प्रशासकीय आणि भारतीय पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी केला. त्यात या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

शिक्षण सचिव म्हणून त्यांच्याकडे नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची जबाबदारी असल्याने सरकारही त्यांना राज्य प्रशासनातून मुक्त करण्यास इच्छूक नाही. हे अधिकारी येणार गोव्यात भारतीय प्रशासकीय सेवेतील गोमंतकीय अधिकारी प्रसन्न आचार्य यांची मिझोराममधून गोव्यात बदली झाली आहे.

Goa Administrative Transfers 2024: लोलयेकर यांची अंदमान, तर गोमंतकीय अधिकारी प्रसन्न आचार्य यांची मिझोराममधून गोव्यात बदली!
Goa LDC Recruitment Scam: एलडीसी नोकरी भरती 'महा घोटाळा', भ्रष्टाचारात अनेकजणांचे हात बरबटले; अमित पाटकरांचा घणाघात

भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2010 च्या तुकडीचे राजेंद्रकुमार शर्मा आणि अवदेश कुमार सिंह यांचीही गोव्यात बदली झाली आहे. दिल्लीतून चेश्ता यादव यांचीही गोव्यात बदली झाली आहे. भारतीय पोलिस सेवेतील 2008 मधील तुकडीचे अजय किशन शर्मा यांची अंदमानहून गोव्यात बदली झाली आहे. तसेच 2010 च्या तुकडीच्या वर्षा शर्मा यांची अंदमानहून गोव्यात बदली झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com