Goa Elections: मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? जेपी नड्डांनी दिले उत्तर

Pramod Sawant हेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार असतील असे नड्डा यांनी स्पष्ट केले आहे.
Pramod Sawant will be the face of polls: JP Nadda
Pramod Sawant will be the face of polls: JP NaddaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यात 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांना (Assembly Elections) सात महिन्यांपेक्षा कमी कालावधी बाकी असताना राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी रविवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) हेच भाजपाच्या प्रचाराचा चेहरा असल्याचे जाहीर केले आहे. पक्षाच्या संसदीय मंडळाकडून याची औपचारिक घोषणा करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे. (Pramod Sawant will be the face of the elections :JP Nadda)

“प्रमोद सावंत यांनी चांगले काम केले असून गोव्याचा सर्वांगीण विकास केला आहे. सावंत यांच्या नेतृत्वात आम्ही पुढे जात आहोत. पक्षाचे संसदीय मंडळ नेतृत्वाबाबत औपचारिक घोषणा करते अशी व्यवस्था पक्षात असल्याने तशी औपचारिक घोषणा होईल ” असे नड्डा यांनी जाहीर केले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करणारा भाजप हा पहिलाच पक्ष ठरला आहे. 2012 मध्ये भाजपाने तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविली होती. 2017 मध्ये भाजपने मुख्यमंत्र्यांच्या उमेदवाराची घोषणा केली नव्हती.

केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना जेव्हा गोव्यात पक्षासाठी काम करण्यास इच्छुक असल्याबदद्ल प्रश्न विचारला असता नड्डा म्हणाले, “ते दिल्लीत खूप चांगले काम करत आहेत.” त्य़ामुळे आता विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेच गोव्यात भाजपच्या प्रचाराचा चेहरा असणार हे स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com