Sanquelim News : ''साखळी पालिकेचा महसूल बुडवू नका'' : मुख्यमंत्री

कार्यालयाच्या पाहणीनंतर नगरपालिका इमारतीत विनावापर असलेल्या गाळ्यांची पाहणी मुख्यमंत्री सावंत यांनी करून माहिती जाणून घेतली.
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

Sanquelim News :साखळी साखळीच्या आमदारांना साखळी नगरपालिका इमारतीत एक सुसज्ज कार्यालय असावे, यासाठी साखळी नगरपालिकेने घेतलेल्या ठरावानुसार इमारतीच्या पहिल्या मजल्यावर काम सुरूही करण्यात आले आहे.

हे कार्यालय सज्ज झाल्यानंतर मुख्यमंत्री साखळीवासीयांसाठी बाजारातील नगरपालिका इमारतीत उपलब्ध असणार आहेत. यावेळी केलेल्या पाहणीनंतर नगरपालिकेला महसूल येत नाही, त्यात गाळे विनावापर ठेवून नगरपालिकेचा महसूल बुडवू नका, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

यावेळी नगराध्यक्षा रश्मी देसाई, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, नगरसेवक दयानंद बोर्येकर, यशवंत माडकर, मुख्याधिकारी कबीर शिरगावकर व इतरांची उपस्थिती होती. कार्यालयाच्या पाहणीनंतर नगरपालिका इमारतीत विनावापर असलेल्या गाळ्यांची पाहणी मुख्यमंत्री सावंत यांनी करून माहिती जाणून घेतली.

या १६ गाळेधारकांनी भाड्याची रक्कम निम्मी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ती करण्यात आली आहे. तरीही गाळेधारक गाळ्यांचा ताबा घेत नसल्यास सदर गाळे इतर प्रक्रिया पूर्ण करून लिलावात काढण्याची सूचना यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी केली.

विकास प्रकल्पांवर चर्चा

मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने साखळी नगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या विविध विकास प्रकल्पांवर मुख्यमंत्री, नगराध्यक्षा, नगरसेवक यांच्यात चर्चा झाली. बाजारात येणाऱ्या बाजार प्रकल्पासाठी आवश्यक असलेले सर्व सोपस्कार त्वरीत पूर्ण करावे.

CM Pramod Sawant
Goa Crime: इंस्टाग्रामवर ओळख करून मित्रांच्या साहाय्याने अल्पवयीन मुलीचे अपहरण

साखळी इस्पितळ जंक्शन ते होंडापर्यंत रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम लवकरच हाती घेतले जाणार असून त्यासाठी रस्त्याच्या बाजूला जागा उपलब्ध करण्याची सूचना केली.

सुमारे साडेतीन कोटी रूपये खर्चून येणाऱ्या बायोमिथेशन प्लांटचे काम लकवरच सुरू केले जाणार आहे.

पालिका विकासाच्या बाबतीत गंभीर

साखळी नगरपालिका विकासाच्या बाबतीत गंभीर असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व पुढाकाराने विविध प्रकल्पांसाठी बराच निधी मंजूर झाला आहे.

ही कामे लवकरात लवकर मार्गी लावून येणाऱ्या काळात साखळीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे यावेळी नगराध्यक्षा रश्मी देसाई यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com