CM Pramod Swant: मुरगाव बंदरात कोळशाची क्षमता वाढवणार नाही

स्वयंपूर्ण गोवा होण्याची गरज आहे
Pramod Swant
Pramod SwantDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: मुरगाव बंदरासाठी येणाऱ्या कोळशाची क्षमता कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढविण्यात येणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सडा येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात दिली.

(Pramod Sawant has said that there will be no increase in coal capacity at Mormugao port)

Pramod Swant
AICC चे नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी 31 PCC प्रतिनिधी गोव्यात करणार मतदान

मुरगाव बंदराचा वापर आयात निर्यात तसेच पर्यटन वाढीसाठी करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांच्या कार्यालयाला भेट दिल्यावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

मुरगाव तालुक्यामध्ये बंदर, विमानतळ, रेल्वे असल्याने त्याचा उपयोग गतीशक्तीसाठी करण्यात येणार आहे. येणाऱ्या काळात मुरगाव बंदरामध्ये विकासकामे हाती घेण्यात येतील, त्याचा लाभ मुरगावासीयांना होईल. येथील मनुष्यबळाचे रुपांतर कौशल्य गुणांमध्ये करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. विविध उद्योगांमध्ये रोजगारांच्या असलेल्या संधींचा लाभ घ्या. येणाऱ्या काळात आदरातिथ्य उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतील. त्यासाठी तयारी ठेवा असे आवाहन सावंत यांनी केले.

Pramod Swant
Special Trains: दिपावलीनिमित्त मध्य रेल्वेची खूशखबर; जादा गाड्या सोडणार

स्वयंपूर्ण गोवा होण्याची गरज आहे

स्वयंपूर्ण गोवा होण्याची गरज आहे. मुरगाव मतदारसंघातील नागरिकांना विविध योजनांचा लाभ व्हावा यासाठी आमदार आमोणकर यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. मुरगाव मतदार संघातील साधनसुविधा विकासासाठी सरकार कटीबध्द असल्याचे सावंत यांनी सांगितले.

या समारंभाअखेरीस 'सूर नवा ध्यास नवा'च्या अंतिम फेरीमध्ये पोहचलेल्या नवाब शेख, हिमालयीन मोटरॅलीचे विजेतेपद पटकाविणाऱ्या अमोल सातोस्कर यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी उपस्थिती लावली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com