नेतेपदी प्रमोद सावंत; शपथविधी ठरेना!

पंतप्रधान येण्यास इच्छुक: गृहमंत्री अमित शहा, जे. पी. नड्डा, नितीन गडकरीही येणार
Pramod Sawant News
Pramod Sawant NewsSandip Desai
Published on
Updated on

पणजी: भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी डॉ. प्रमोद सावंत यांची एकमताने निवड झाल्यानंतर त्यांनी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला असला, तरी शपथविधीसाठी त्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा हे दोघेही येणार असल्याने तारीख खोळंबली आहे. त्यामुळे शपथविधी 26 नंतर होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हे उत्तरप्रदेशच्या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर लागलीच गोव्याची तारीख निश्चित केली जाईल, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी आज दै. ‘गोमन्तक’ला दिली. (Pramod Sawant News)

काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत यावेळी राजभवनावर विधिमंडळातील भाजपचे 19, मगोपचे 2 आणि 3 अपक्ष आमदार उपस्थित होते.

Pramod Sawant News
Goa Corona Updates: दिवसभरात कोरोना संक्रमणाचा दर शून्यावर

त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय नाट्याला पूर्णविराम मिळाला आहे. नव्या सरकारच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी येणार असल्याने शपथविधीचा सोहळा आणखी दोन दिवस लांबणीवर पडला आहे. यासंबंधी पंतप्रधानांच्या कार्यालयाशी चर्चा करून शपथविधीची तारीख उद्या जाहीर करण्यात येणार आहे. तसेच शपथविधी ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडिअमवर होणार असल्याची माहिती आहे. नेता निवडीनंतर लगेच केंद्रीय समिती, गोवा प्रभारी आणि डॉ. सावंत यांनी अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड, अंतोनियो वाझ, डॉ. चंद्रकांत शेट्ये, मगो आमदार सुदिन ढवळीकर, जीत आरोलकर या 5 आमदारांशी चर्चा करून राजभवन गाठले. तेथे राज्यपाल पिल्लई यांच्याकडे 25 आमदारांच्या बहुमताचे पत्र सादर करत सरकार स्थापनेचा दावा केला.

मगोच्या पाठिंब्याला विरोध कायम

विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र निवडणुका लढविलेल्या मगो पक्षाचा पाठिंबा घेण्याबाबत भाजप आमदारांमधील विरोध तीव्र झाला असून बाबूश मोन्सेरात, नीलेश काब्राल, गोविंद गावडे, जोशुआ डिसोझा, रवी नाईक यांनी स्वतंत्र बैठक घेऊन आपला विरोध कायम असल्याचे पक्ष नेत्यांना सांगितले आहे.

मंत्रिमंडळात राणे दुसऱ्या स्थानावर

मुख्यमंत्री सावंत यांचे कट्टर प्रतिस्पर्धी गणले गेलेले विश्वजीत राणे यांना नवीन मंत्रिमंडळात महत्त्वाचे त्यांच्या पसंतीचे खाते मिळेलच, शिवाय त्यांचे स्थान दुसऱ्या क्रमांकाचे असेल. यापूर्वीच्या मनोहर पर्रीकर व सावंत मंत्रिमंडळात त्यांना जरी आरोग्य व उद्योग खाते दिले असले, तरी क्रमवारीमध्ये ते खूपच खाली होते. त्यामुळे ते अस्वस्थ होते. मगोपचा मंत्रिमंडळात समावेश करण्यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी सावंत यांना तातडीने दिल्लीत बोलावून घेण्यात आले. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वजीत राणे यांनाही खास बोलावून घेतले होते. यावरूनच राणे यांच्या स्थानाबद्दल दिल्लीनेही गंभीरपणे दखल घेतली आहे, हे स्पष्ट झाले. तरीही त्यांना गृह किंवा वित्त खाते मिळेल का? याबद्दल सुकाणू समितीच्या मनात शंका आहे.

कसा असेल मंत्रिमंडळाचा आकार?

मंत्रिमंडळाचा आकार कसा असेल यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस हे प्रमोद सावंत व सदानंद शेट तानावडे यांच्याबरोबर चर्चा करून मंत्रिमंडळाची नावे व आकार निश्चित करतील. मंत्रिमंडळात चार कॅथलिक, दोन भंडारी, दोन मराठा व एक ब्राह्मण असे स्वरूप असेल. ख्रिस्ती मंत्र्यांमध्ये माविन गुदिन्हो, नीलेश काब्राल, मोन्सेरात पती-पत्नीमधील एक व आलेक्स रेजिनाल्ड यांच्या निवडीस प्राधान्य राहील. भंडारी समाजातील नेत्यांमध्ये रवी नाईक व सुभाष शिरोडकर यांचा मंत्रिमंडळात समावेश असेल. एसटी समाजाचे गोविंद गावडे व रमेश तवडकर यांची नावे निश्चित झाली आहेत. ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधीत्व सुदिन ढवळीकर करतील, तर त्यात एकमेव सारस्वत हे रोहन खंवटे असतील.

Pramod Sawant News
गोमंतकीय युवकाची अमेरिकेत गोळ्या घालून हत्या

राणेंनी सुचविले सावंत यांचे नाव!

मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत राणे व गुदिन्हो यांनी दावे केल्यामुळे पेच वाढला होता, परंतु विशेष निरीक्षक नरेंद्र सिंग तोमर, केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांच्या उपस्थितीत आज विधिमंडळ नेतेपदी डॉ. प्रमोद सावंत यांचे नाव एकमताने जाहीर करण्यात आले. या बैठकीत सावंत यांचे नाव विश्‍वजीत राणे यांनी सुचविल्यानंतर त्याला आमदार रवी नाईक, रोहन खंवटे, माविन गुदिन्हो आणि जेनिफर मोन्सेरात यांनी अनुमोदन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com