

पणजी: राज्य सरकार (Goa Government) 10 हजार पदे भरून सरकारी तिजोरीवर ताण वाढवत असल्याची टीका करणाऱ्यांनी आधी दरवर्षी सरकारी सेवेतून किती कर्मचारी सेवानिवृत्त होतात, याची नीट माहिती घ्यावी. सर्वसाधारण नोकरभरती किती वर्षांपूर्वी झाली होती, ते पाहावे. त्यानंतरच याविषयी भाष्य करावे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी सांगितले. (Pramod Sawant alleged that the people are being misled by the Congress in the recruitment issue)
काँग्रेसचे राज्य प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी सरकारच्या नोकरभरतीमुळे सरकारी तिजोरीवर ताण येणार असल्याची टीका केली होती. त्याकडे आज त्यांचे लक्ष वेधल्यावर ते म्हणाले, त्यांचे वक्तव्य स्थानिक नेत्यांनी दिलेल्या चुकीच्या माहितीवर असू शकते. सरकारमध्ये दरवर्षी कर्मचारी निवृत्त होत असतात. त्या जागा भराव्या लागतात. त्या भरल्या गेल्या नाहीत, तर त्या रद्द होतात. आता 10 हजार जागा भरणार, याचा अर्थ असलेल्या कर्मचाऱ्यांत आणखी 10 हजार जणांची भर पडणार आणि वेतनावरील खर्च वाढणार, ही केवळ काहींची कल्पना आहे. ते वस्तुस्थितीपासून दूर आहेत.
करिअरविषयक मार्गदर्शन
यंदा 10 व 12 उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शन त्यांचे शिक्षक करणार आहेत. करिअरविषयक समुपदेशन केले जावे, अशी सरकारने शिक्षण खात्याला सूचना केली आहे. योग्य तो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांकडून निवडला जावा, यासाठी हे मार्गदर्शन असेल. शिक्षकच ही माहिती विद्यार्थ्यांना देणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.