Codar IIT Projct: 'आयआयटी गोव्यात पाहिजेच, पण कोडारमध्ये नको'! वेळीपांचे प्रतिपादन; ‘उटा’ संघटनेचा ग्रामस्थांना पाठिंबा

Goa IIT Projct: ‘उटा’ संघटनेचे अध्यक्ष विश्‍वास गावडे तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी प्रकाश वेळीप यांच्यासह रविवारी (ता.२१) कोडार गावाला भेट देऊन तेथील जमिनीची पाहणी केली.
Goa IIT
Codar IITDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: आयआयटी हे उच्च शिक्षणाचे केंद्र असून ते गोव्यात व्हायलाच हवे; पण त्यासाठी चुकीची जागा निवडू नका. ज्या लोकांची रोजीरोटी चालते, ती जमीन आयआयटीसाठी देऊन या लोकांच्या पोटावर पाय देऊ नका, असे आवाहन नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ‘उटा’ संघटनेचे प्रतिनिधी तथा माजी मंत्री प्रकाश वेळीप यांनी केले.

‘उटा’ संघटनेचे अध्यक्ष विश्‍वास गावडे तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी प्रकाश वेळीप यांच्यासह रविवारी (ता.२१) कोडार गावाला भेट देऊन तेथील जमिनीची पाहणी केली व स्थानिकांशी चर्चा केली.यावेळी विश्‍वास गावडे म्हणाले की, ‘उटा’ संघटनेचा पूर्ण पाठिंबा कोडारवासीयांना आहे.

Goa IIT
Kodar IIT Project: 'कोडारमध्‍ये आयआयटी प्रकल्‍प आणून दाखवाच", 'आरजी'चा इशारा; कार्यकर्त्यांचा गावात मोर्चा

आयआयटी प्रकल्प आणताना सरकारने साऱ्या गोष्टींची पडताळणी करून पाहायला हवी. आदिवासी समाजाच्या हक्काआड येण्याचा प्रकार सरकारने करू नये. ‘उटा’ संघटनेचा पूर्ण पाठिंबा कोडार ग्रामस्थांना आहे. इतरांनीही आपले विचार व्यक्त करताना कोडारवासीयांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला.

Goa IIT
Codar IIT Project: आयआयटीविरोधात विशेष ग्रामसभेची मागणी! कोडारमध्ये विरोध; सरपंचांना ग्रामस्थांचे निवेदन

लोकांच्या जीवनाशी खेळू नये

प्रकाश वेळीप म्हणाले की, आदिवासी समाजावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आम्ही प्रत्येकवेळी आवाज उठवला आहे. त्यामुळे सरकारने आयआयटी प्रकल्प कोडारसारख्या निसर्गसंपन्न भागात आणून येथील लोकांच्या जीवनाशी खेळू नये. आयआयटी प्रकल्प ही गरज आहे; पण त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी योग्य जागा निवडावी आणि हा प्रकल्प गोव्यात जरूर आणावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ladakh student drowned in goa river accident
CM Pramod Sawant Water Metro Presentation
Guirim River Project
Goa IIT
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com