गोव्यातील 'या' भागांमध्ये दुरुस्ती कारणास्तव राहणार वीज खंडित! जाणून घ्या अधिक माहिती..

Goa Electricity Department: मडगावात खालील ठिकाणी ५ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी ९ ते दुपारी ३ वा.पर्यंत वीज खंडित केली जाईल. महत्त्वाच्या दुरुस्तीसाठी पेडणे तालुक्यातील काही भागात सोमवार, ४ ते शुक्रवार, ८ रोजीपर्यंत वीजपुरवठा खंडित ठेवण्यात येणार
Goa Electricity Department
Goa Electricity DepartmentCanva
Published on
Updated on

Scheduled Power Interruption in Goa Margao Pernem

सासष्टी: मडगावात काही ठिकाणचे एलव्ही बोर्ड, फिडर पिलर्स बदलायचे असल्याने तसेच सेवा पिलर्सची दुरुस्ती करायची असल्याने खालील ठिकाणी ५ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी ९ ते दुपारी ३ वा.पर्यंत वीज खंडित केली जाईल, असे आके, मडगाव येथील वीज खात्याच्या कचेरीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे नागरिकांना कळविले आहे.

मंगळवार, ५ रोजी केरकर इस्पितळ (प्रियांका अपार्टमेंट, सब्रिना अपार्टमेंट व परिसर), बुधवार, ६ रोजी क्रुनेट मालभाट (अलंकार इमारत, स्टर्लिंग अपार्टमेंट, कारो हाऊस, समाधान इमारत, कणकेश्र्वरी इमारत, शिव इमारत व परिसर), गुरुवार, ७ रोजी आपना बाझार, रिलायन्स, सिद्धार्थ इमारत (माबाय हॉटेल, रायकर फोटो स्टुडिओ व परिसर), शुक्रवार, ८ रोजी दमोदर हाऊसिंग सोसायटी (परिसर), शनिवार, ९ रोजी पांडवा कपेल (तिंबलो हाऊस, पद्मा मेडिकल स्टोअर, लक्ष्मी बेकरी, बाळू रेसिडेन्सी, ईगल हाऊस, पांडवा कपेल व परिसर). नागरिकांनी या वीज खंडित नोटिसीची दखल घेऊन सहकार्य करावे, अशी विनंती वीज खात्यातर्फे करण्यात आली आहे.

Goa Electricity Department
Goa Crime: गोव्यात अज्ञात मृतदेहाचे गुपचूप दफन, कुर्टीत खळबळ; घातपाताचा संशय

पेडणेतही दुरुस्ती

दरम्यान, महत्त्वाच्या दुरुस्तीसाठी पेडणे तालुक्यातील काही भागात सोमवार, ४ ते शुक्रवार, ८ रोजीपर्यंत वीजपुरवठा खंडित ठेवण्यात येणार असल्याचे पेडणे वीज कार्यालयातून कळविण्यात आले आहे. सोमवार, ४ रोजी हाळी व चांदेल परिसर, बुधवार, ६ रोजी पेडणे आयटीआय, चिवय व मुरमुसे, गुरवार, ७ रोजी तोर्से ग्रामपंचायत क्षेत्रातील फकीरपाटो परिसर, शुक्रवार, ८ रोजी मोपा परिसरातील देऊळवाडा व गोठणवाडा परिसर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com