Shigao: सांजावदिवशी कुळे, मोले, शिगाव परिसर काळोखात! ग्रामस्थ संतप्त; बंच केबल बिघडल्याने गोंधळ

Goa Electricity Issue: शिगाव सबस्टेशनला पंटेमळ येथून वीज पुरवठा मिळाला नसल्याने कुळे, मोले, शिगाव पंचायत क्षेत्रातील सर्व भागात दोन तास वीजपुरवठा खंडित राहिला.
No Electricity Goa
No ElectricityDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: शिगाव सबस्टेशनला पंटेमळ येथून वीज पुरवठा मिळाला नसल्याने कुळे, मोले, शिगाव पंचायत क्षेत्रातील सर्व भागात दोन तास वीजपुरवठा खंडित राहिला. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता खंडित झालेली वीज सायंकाळी ८-१५ वाजता सुरळीत झाली.

या संदर्भात साहाय्यक वीज अभियंता सुशांत कुंकळकर यांनी सांगितले की, बंच केबल नादुरुस्त झाल्याने शिगाव सबस्टेशनला पंटेमळ येथून होणारा ३३ केव्ही वीज पुरवठा खंडित झाला, त्यामुळे या भागात वीज पुरवठा होऊ शकला नाही. बँच केबलमधील दोष दूर केल्यानंतर पुरवठा सुरळीत झाला, असे त्यांनी सांगितले.

या भागात खंडित वीज पुरवठा ही सततची समस्या असून वारंवार वीज गायब होत असल्याने लोक हैराण आहेत. या समस्येवर कायमचा तोडगा काढणे आवश्‍यक आहे, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.

No Electricity Goa
Shigao: दिवसातून दहावेळा वीज जाते, बिले मात्र दुप्पट; शिगाववासीय नाराज, कमी-उच्च दाबामुळे उपकरणे होताहेत खराब

नंदीश नाईक देसाई, माजी पंच

सण असतो त्याच दिवशी वीज पुरवठा खंडित होते. सांजावचा दिवस असल्याने कुळेतील ख्रिश्चनबांधवानी विविध कार्यक्रम आयोजित केले होते, पण वीज नसल्याने कार्यक्रमांना व्यत्यय आला. या भागात सतत वीज पुरवठा खंडित का होतो याचा शोध अधिकाऱ्यांनी घ्यावा.

No Electricity Goa
Kulem Shigao: कुळे-शिगावात 3 युवकांना भर बाजारात मारहाण! चारजण पोलिसांच्या ताब्यात

भूमीगत वाहिन्यांच्या प्रस्ताव पडून

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिगाव सबस्टेशनला ३३ केव्ही जोडणीतून वीज पुरवठा पंटेमळ येथून होत असतो. ही वाहिनी जंगलात असल्याने वारंवार बिघाड निर्माण होतो. यासाठी भूमीगत वाहिन्या घालण्याचा प्रस्ताव आहे. पंटेमळ ते शिगाव ५२ कोटी तर धारबांदोडा ते सावरगाळपर्यंत केबल घालण्यासाठी ५ कोटीचा खर्च प्रस्तावित आहे. परंतु या फाईल्स मंजुरीच्या प्रतीक्षेत सध्या सरकार दरबारी पडून आहेत. स्थानिक आमदार गणेश गांवकर यांनी यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com