इंडियन ऑइलच्या खोदकामात वीजवाहिनींना तडे; संकल्प आमोणकरांनी केली भागाची पाहणी

मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी इंडियन ऑइल गॅस कंपनीने भूमिगत वीज वाहिनी केबल खराब केल्याने तसेच गुरुवार पर्यंत विविध भागात तब्बल 22 तास वीज परवठा खंडित झाल्याने सुरक्षेच्या प्रक्रियेवर चिंता व्यक्त केली.
Sankalp Amonkar
Sankalp AmonkarDainik Gomantak
Published on
Updated on

मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी इंडियन ऑइल गॅस कंपनीने भूमिगत वीज वाहिनी केबल खराब केल्याने तसेच गुरुवार पर्यंत विविध भागात तब्बल 22 तास वीज परवठा खंडित झाल्याने सुरक्षेच्या प्रक्रियेवर चिंता व्यक्त केली.

या घटनेत पोलिसांनी कोणालाही अटक का केलेली नाही असा सवाल करताना 22 तास वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे होणारे नुकसान संबंधित कंपनीकडून वसूल करावे, अशी मागणी आमदार आमोणकर यांनी केली आहे.

इंडियन ऑइल अदानी गॅस पाईपलाईन घालण्याच्या कामाच्या दरम्यान मजुरांनी केलेल्या खोदकामामुळे भूमिगत वीजवाहिनीना तडे गेल्याने वास्को शहरी भागाबरोबरच मुरगाव मतदार संघातील संपूर्ण भागात वीज पुरवठ्यावर परिणाम झाला होता.

Sankalp Amonkar
प्रमोद मुतालिक यांच्यावरील गोव्यातील प्रवेशबंदी वाढवली

याविषयी संकल्प आमोणकर यांनी इंडियन ऑइल गॅस कंपनीच्या गॅस पाईपलाईनच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल करूनही पोलिसांनी कोणालाही अटक केली नसल्याचे त्यांनी सांगितले. तर वीज खंडित झाल्याने झालेले सर्व नुकसान कंपनी कडून वसूल करण्यात यावे, अशी मागणी आमोणकर यांनी केली. इंडियन गॅस कंपनीने भूमिगत केबल खराब केल्याने 22 तास वीज खंडित झाल्याने संपूर्ण मुरगाव मतदारसंघ अंधारात होता.

मी स्वतः घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यात विभागाची कोणतीही चूक नसताना नुकसान सोसावे लागले. विनाकारण वीज खंडित झाल्याने अनेक आईस्क्रीम पार्लर, घाऊक विक्रेते, मच्छीमार त्यांचे मठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अनेकांची विविध प्रकारे नुकसान झाले आहे. मी अधिकार्‍यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी या घटनेला ठेकेदार जबाबदार असल्याचे सांगितले. त्यानुसार ठेकेदार विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असल्याचे अमोणकर म्हणाले.

कंत्राटदाराला परवानगी कोणी दिली असा प्रश्‍न केला असता, वीज विभागाकडे कोणतेही उत्तर नव्हते. तसेच त्यांना याविषयी माहिती दिली नसल्याने वीज खात्याकडून सांगितले. खोदकाम करण्यापूर्वी पाण्याचे आणि वीज वाहिन्यांसंदर्भात तपासणीसाठी कंत्राटदाराने वीज विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे समन्वय साधून त्यांच्याकडून नकाशा घेणे आवश्यक होते.

मात्र कोणतीही खबरदारी न घेता थेट खोदकाम सुरू केले आणि भूमिगत केबलचे नुकसान केले असे आमोणकर यांनी सांगितले. ही काही पहिलीच घटना नाही यापूर्वी याच कंपनीने 2018 साली सेंट जसिंतो आयलॅण्ड येथे केबलचे नुकसान केले होते. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर संपूर्ण वास्कोला अंधारात राहावे लागले होते. तसेच आयओएजीला सरकारची भीती नाही. तसेच अदानीच्या सहभागामुळे त्यांची चौकशी करणारे कोणीही नाही.

वीज विभागाने दाखल केलेल्या एफआयआरवर पोलिसांनी कोणतीही अटक केली नाही. काल परराज्यातून वीज खरेदी करताना सरकारचे कोट्यावधींचे नुकसान झाले. ते कंपनी कडून वसूल करणे क्रमप्राप्त आहे. पोलिसांनी कंट्रातदाराच्या लोकांना अटक केली नाही. तर यापुढे आम्ही कंपनीचे खोदकाम रोखून धरणार असा इशारा आमोणकर यांनी यावेळी दिला.

पाणी आणि वीज जोडणीसाठी एखाद्या सामान्य माणसाला खूप परवानग्या घ्याव्या लागतात आणि खूप पैसे मोजावे लागतात. तर मोठ्या कंपन्यां परवानगी शिवाय कुठेही काम करतात आणि भूमिगत केबलचे नुकसान करून मोकळे होतात. कंपनी परवानगीशिवाय खोदकाम करते व नंतर खोदकाम करून ते व्यवस्थित झाकले जात नाही.

गॅस पाईप लाईन टाकली जाते तेव्हा सुरक्षितता खूप महत्वाची आहे. दहा वर्षांपूर्वी मांगूरहिल धाकतळे येथे नाफ्त्याला आग लागून लोक मरण पावले होते. झूवारीनगर येथे गवताला आग लागून गॅस पाईप लाईन जाळली होती. इंडियन ऑइल गॅस कंपनी सुरक्षित आहे की नाही हे कोण तपासणार आणि भविष्यात कोणतीही घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण या गॅस पाईप लाईनचा नकाशा कोणाकडे असेल.

कारण उद्या कोणत्याही कामासाठी सरकारी किंवा सामान्य रहिवासासाठी हे महत्त्वाचे आहे असे आमोणकर यांनी सांगताना आम्हाला वास्को शहराच्या सुरक्षिततेबद्दल खात्री नाही. अदानी वास्कोच्या लोकांना किंवा सरकारला गृहीत धरते. या सर्व गोष्टीत सरकारने हस्तक्षेप करून कारवाई करावी आणि या कंपनीविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरवर पोलिसांनी संबंधितांना अटक करून या कंपनीला मोठा दंड ठोठावा अशी मागणी त्यांनी केली. कंपनीविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरची माहिती जाणून घेण्यासाठी पोलिसांना भेटणार असल्याचे आमदार संकल्प आमोणकर शेवटी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com