Goa News: गरिबी, व्यसनाधीनता देशासमोरचे गंभीर प्रश्न; बेसेलिओस मार्थोमा मॅथ्यूज यांचे वक्तव्य

‘द कंटेम्पररी स्पीचेस’ पुस्तकाचे प्रकाशन : कार्यक्रमाला कॅथॉलिक धर्मीय ११ बिशप उपस्थित
The Contemporary Speeches Book Publication
The Contemporary Speeches Book PublicationDainik Gomantak
Published on
Updated on

गरिबी, व्यसनाधीनता हे देशासमोरचे गंभीर प्रश्न असून ते सोडवण्यासाठी सरकारसह सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत पूर्व मालंकारा मेट्रोपॉलिटनचे कॅथॉलिक, परमपूज्य बेसेलिओस मार्थोमा मॅथ्यूज (तिसरे) यांनी व्यक्त केले आहे.

The Contemporary Speeches Book Publication
Eco-Sensitive Zone: पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र जाहीर करण्‍यास चालढकल; प्रतिज्ञापत्रावरून स्‍पष्‍ट

दोना पावला येथील राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांच्या 'द कंटेम्पररी स्पीचेस' या पुस्तकाचे परमपूज्य बेसेलिओस मार्थोमा मॅथ्यूज तिसरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी कॅथॉलिक धर्मीय अन्य ११ बिशप आणि पंचायत मंत्री माविन गुदिन्हो उपस्थित होते.

मंत्री गुदिन्हो म्हणाले राज्यपाल पिल्लई यांचे विविध क्षेत्रातील कार्य महान आहे. याशिवाय साहित्य क्षेत्रांमध्ये ते करत असलेले योगदान सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. यावेळी राज्यपालांना भुवनेश्वर विद्यापीठाने दिलेल्या पदवीसाठी त्यांचा परमपूज्य मॅथ्यूज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी राज्यपालांनी सत्काराला उत्तर देत आपण सुरवातीपासून सर्वधर्मसमभाव शिकलो आहे. आणि दैनंदिन जीवनात त्याची करत आलो आहे असे सांगितले. राज्यपालांचे सचिव एम. आर. एम. राव यांनी प्रास्ताविक केले. मिहीर वर्धन यांनी राजभवनात सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com