Goa : गोव्याच्या संस्कृतीला इतिहास पूर्व काळापासून जलसंसाधारण आणि जलसंवर्धनाचा इतिहास पूर्व कालखंडापासून समृद्ध वारसा लाभलेला आहे. आणि आजच्या काळात ही परंपरा टिकविण्याची गरज आहे असे प्रतिपादन पौर्णिमा केरकर यांनी केले.
केंद्रीय जलशक्ती, सांस्कृतिक मंत्रालय आणि मध्यप्रदेश सरकार यांच्या सहकार्याने दीनदयाळ शोध संस्थान नवी दिल्ली यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय परिसंवादात मांडू (मध्य प्रदेश) येथील प्रसिद्ध जलमहालात केरकर बोलत होत्या.
दोन दिवसीय परिसंवादाचे उद्घाटन नुकतेच केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, मध्यप्रदेशचे मंत्री राजवर्धन सिंह, जीतेंद्र जामदार, दीनदयाळ शोध संस्थेचे अतुल जैन यांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी जलसंवर्धन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संशोधक प्राध्यापक कार्यकर्ते यांनी शोध निबंधाचे सादरीकरण केले. डॉ.सुचित्रा हरमलकर यांनी अमरकंटक ते भडोचपर्यंतचा ऐतिहासिक सांस्कृतिक प्रवास साथी कलाकारांच्या सहकार्याने नृत्य नाटिकेद्वारे सादर केला.
मंदिर संस्कृतीमधून जल संवर्धन
गोव्याच्या देवभूमीत मंदिर संस्कृतीने देवतळ्या, देवझरी, देव विहिरी यांच्या माध्यमातून जल संवर्धन केले आहे. गौरीपूजन, नदीतील ऋषीपूजन, ख्रिस्ती धर्मियांचा सांजाव उत्सव आदीतून जल संस्कृतीचे दर्शन घडते. इतिहास पूर्व कालखंडात कुशावती नदीकिनारी फणसायमळ, काजूर, पिर्ला व म्हाऊस येथे आदिमानवाने पाण्याच्या सानिध्यात आपले जगणे समृद्ध केले होते. गोव्यातील धार्मिक आणि सांस्कृतिक अधिष्ठान लाभलेली तीर्थक्षेत्रे जल स्रोतांच्या सान्निध्यात वसलेली आहेत असे पौर्णिमा केरकर यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.