Panjim Municipality Tax Collection : पणजी महापालिकेत ‘टपाल’ खात्याची 20 लाखांची थकबाकी

वसुलीसाठी 15 पथके स्थापन; महापालिकेला 35 कोटी 23 लाख येणे बाकी
Panjim Municipality
Panjim MunicipalityDainik Gomantak
Published on
Updated on

Panjim Municipality Tax Collection महापालिकेची व्यावसायिक, घरपट्टी व इतर करांपोटी येणारी थकित रक्कम 35 कोटी 23 लाख 21 हजार 937 रुपये आहे. त्यापैकी केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या टपाल खात्याकडून 20 लाखांचे येणे आहे. तर पर्यटन खात्याकडे 13 लाख रुपये थकित आहेत. सध्या महापालिकेने या वसुलीसाठी कडक पावले उचलली असून, त्यासाठी 15 पथके गठित केलेली आहेत.

आयुक्त आग्नेल फर्नांडिस यांनी सांगितले, पणजी महापालिकेची वसुली शंभर टक्के झाल्यास विविध कामे मार्गी लागू शकतात. व्यावसायिक, रहिवासी व इतर आस्थापनांनी नियमितपणे महापालिकेचा कर भरला तर थकित रकमेचा फुगवटा दिसणार नाही. परंतु 2021-22 व 2022-23 अशा दोन वर्षांचे एकूण 54.01 कोटी रुपये थकित होते, तर वसुली 18 कोटी 72 लाख रुपये झाली आहे. तर उर्वरित 35.23 कोटी थकित आहेत. या थकित वसुलीसाठी महापालिकेने कडक पावले उचलली आहेत.

Panjim Municipality
Fraud in Goa : निम्म्या किमतीत डिझेलचे आमिष दाखवत एक लाखांचा चुना

महापालिकेचे एटीओ सिद्धेश नाईक यांनी सांगितले की, आम्ही थकबाकीदारांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. नुकत्याच झालेल्या वित्त आयोगाच्या बैठकीत थकित कर वसुलीवर भर देण्याच्याही सूचना करण्यात आल्या होत्या. या आर्थिक वर्षाअखेरीपर्यंत उर्वरित 35 कोटींची थकबाकी वसुलीचे आमचे लक्ष्य आहे. त्यासाठी 15 पथके तयार करण्यात आली आहेत. ज्यांनी घरपट्टी, व्यवसाय कर व इतर कर भरलेले नाहीत, त्यांनी ते भरावेत. लाखापेक्षा जास्त रक्कम असलेल्या आस्थापने, कार्यालयांना नोटीस बजावण्यास सुरू केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com